'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीची लेक झळकणार रुपेरी पडद्यावर, शूटिंगला केली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 20:01 IST2023-05-08T20:01:05+5:302023-05-08T20:01:38+5:30
'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री (Bhagyashree)ची लेक अवंतिका दासानी(Avantika Dasani)ने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. इतकेच नाही आईप्रमाणे लेकदेखील खूप सुंदर दिसते.

'मैंने प्यार किया' फेम भाग्यश्रीची लेक झळकणार रुपेरी पडद्यावर, शूटिंगला केली सुरुवात
'मैने प्यार किया' फेम भाग्यश्री (Bhagyashree)ची लेक अवंतिका दासानी(Avantika Dasani)ने आईच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. इतकेच नाही आईप्रमाणे लेकदेखील खूप सुंदर दिसते. अवंतिकाने रोहन सिप्पीच्या सायकोलॉजिकल थ्रिलर-ड्रामा सीरिज 'मिथ्या'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या सीरिजनंतर आता ती लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. तिने नुकतीच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
'मैंने प्यार किया' या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सिनेसृष्टीपासून दूर गेलेली आणि पुनरागमनात पती हिमालयसोबतच सिनेमे केलेली भाग्यश्री नुकतीच 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सहपरिवार दिसली होती. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दासानीने यापूर्वीच हिंदी सिनेसृष्टीची वाट धरली आहे. भावाच्या पावलावर पाऊल टाकत बहिण अवंतिकाही मनोरंजन विश्वात दाखल होत आहे.
'यु शेप की गल्ली' नावाच्या आगामी चित्रपटाद्वारे अवंतिका अभिनय क्षेत्रात उतरणार आहे. याचं दिग्दर्शन अविनाश दास करत असून यात तिच्या जोडीला विवान शाह आहे. या चित्रपटातील शबनमच्या कॅरेक्टरसाठी मेकर्स एका फ्रेश चेहऱ्याचा शोध घेत होते. आॅडीशनच्या माध्यमातून त्यांना अवंतिका मिळाली. या चित्रपटात जावेद जाफरीही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या महिन्यातच लखनऊमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.