"इंडिया खेलना है तो गेम का लेव्हल बढाओ", अजय देवगणच्या वाढदिवशी 'मैदान'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 12:09 IST2024-04-02T12:07:45+5:302024-04-02T12:09:15+5:30

अजय देवगणच्या वाढदिवशी 'मैदान' चा ट्रेलर रिलीज झालाय. अजयच्या अभिनयाचा जबरदस्त आविष्कार पाहायला मिळतोय

Maidan final trailer released on Ajay Devgan's birthday starring priyamani, gajraj rao | "इंडिया खेलना है तो गेम का लेव्हल बढाओ", अजय देवगणच्या वाढदिवशी 'मैदान'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

"इंडिया खेलना है तो गेम का लेव्हल बढाओ", अजय देवगणच्या वाढदिवशी 'मैदान'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

गेल्या अनेक दिवसांपासून अजय देवगणच्या 'मैदान' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. भारतीयफुटबॉलच्या इतिहासातील सत्यघटनेवर आधारीत हा सिनेमा आहे. आज अजय देवगणचा वाढदिवस. त्यानिमित्ताने 'मैदान'चा फायनल ट्रेलर रिलीज झालाय. भारतीयफुटबॉलला सुरुवातीच्या काळात सोसाव्या लागणाऱ्या संघर्षाची कहाणी ट्रेलरमध्ये दिसतेय. 'मैदान'चा ट्रेलरमध्ये अजय देवगणचा जबरदस्त अभिनय पाहायला  मिळतोय. 

'मैदान'च्या ट्रेलरमध्ये प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची कहाणी दिसते. फुटबॉल खेळात भारताला गौरव मिळवून देण्यासाठी रहीम यांनी केलेले समर्पण पाहायला मिळते. रहीम यांनी भारतीय फुटबॉल संघाची मोट कशी बांधली आणि आसपासच्या लोकांकडून त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला, याची अंगावर काटा आणणारी  कहाणी 'मैदान' मध्ये दिसते.

झी स्टुडिओज, बोनी कपूर, अरुणवा जॉय सेनगुप्ता आणि आकाश चावला निर्मित 'मैदान'ची पटकथा आणि संवाद अनुक्रमे सायविन क्वाद्रस आणि रितेश शाह यांनी लिहिले आहेतय. संगीत ए आर रहमान आणि गीत मनोज मुंतशिर शुक्ला यांचे आहे. अजय देवगण, गजराज राव, प्रियामणी हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट  ईद 2024 रोजी अर्थात 10 एप्रिल 2024 रोजी रिलीज होत असून IMAX मध्ये देखील जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.

 

Web Title: Maidan final trailer released on Ajay Devgan's birthday starring priyamani, gajraj rao