माहिरा म्हणते, शाहरूखसमोर उभे झाले अन् सगळेच विसरले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 20:48 IST2016-07-28T15:18:14+5:302016-07-28T20:48:14+5:30
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान बॉलिवूड डेब्यू करतेय. ‘रईस’ या चित्रपटात माहिरा झळकणार आहे. पहिल्याच बॉलिवूडपटात किंगखान शाहरूख खानसोबत काम ...
.jpg)
माहिरा म्हणते, शाहरूखसमोर उभे झाले अन् सगळेच विसरले...
प किस्तानी अभिनेत्री माहिरा खान बॉलिवूड डेब्यू करतेय. ‘रईस’ या चित्रपटात माहिरा झळकणार आहे. पहिल्याच बॉलिवूडपटात किंगखान शाहरूख खानसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने माहिरा जाम खूश आहे. खरे तर शाहरूखसोबत काम करण्याची संधी म्हणजे, माहिरासाठी स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. पण तरिही प्रत्यक्ष शाहरूखसमोर आल्यावर माहिराला कमालीचे दडपण आले होते. हे आम्ही नाही तर माहिराने स्वत:च सांगितले. शाहरूखसोबत काम करण्याची संधी म्हणजे, माझ्यासाठी स्वप्नपूर्ती होती. मी प्रचंड उत्साहित होते. पण मनातून तेवढीच घाबरलेही होते. मला स्वत:ला सिद्ध करायचे होते आणि याचेच मला कमालीचे दडपण आले होते. माझा पहिलाच सीन शाहरूखसोबत होता. त्यामुळेच मी माझे डायलॉग्स अगदी तोंडपाठ केले होते. पण शॉट द्यायला शाहरूखसमोर उभी झाले आणि सगळेच विसरले. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही, अशी एक आठवण माहिराने सांगितली. शाहरूख-माहिराचा ‘रईस’ पुढीलवर्षी २७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. शाहरूख व माहिराची पडद्यावरची केमिस्ट्री कशी रंगलीय, ते तेव्हा दिसेलच!!