बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ, खुलासा करत म्हणाली-मी त्याच्याशी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:33 IST2023-04-18T13:25:52+5:302023-04-18T13:33:21+5:30

अभिनेत्रीने गुपचूप लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.

Mahie gill confirms about marrying actor entrepreneur ravi kesar know more details here | बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ, खुलासा करत म्हणाली-मी त्याच्याशी....

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ, खुलासा करत म्हणाली-मी त्याच्याशी....

बॉलिवूड अभिनेत्री माही गिलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. गेला काही काळापासून ती रुपेरी पडद्यापासून दूर आहे. दरम्यान, आता माही गिलने गुपचूप लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. जरी अभिनेत्रीने तिची वैवाहिक स्टेट्स सीक्रेट ठेवलं होते. एका रिपोर्टनुसार, माहीने आपण विवाहित असल्याचा खुलासा केला आहे.


माही गिलने केलं लग्न
हिंदुस्तान टाईमच्या रिपोर्टनुसार, माही गिलने अभिनेता-उद्योजक रवी केसरशी लग्न केले आहे. विशेष म्हणजे या दोघांनी 2019 मध्ये डिजिटल सीरिज 'फिक्सर'मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली होती. रिपोर्टनुसार माही गिलने गोव्याला शिफ्ट झाली आहे. जिथे ती पती आणि मुलगी वेरोनिकासोबत राहते. दोघांचे लग्न कधी झाले याबद्दल कोणतीही माहिती नाही. रिपोर्टनुसार, माहीने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की, 'मी त्याच्याशी लग्न केले आहे.'


माही गिलला आहे एक मुलगी 
माही गिलने तिचे वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवले आहे. 2019 मध्ये, गिलने जेव्हा त्याला अडीच वर्षांची मुलगी असल्याचे जाहीर केले तेव्हा सर्वांना आश्चर्यचकित केले. या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अभिनेत्री म्हणाली होती, "मी वेरोनिकाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट न करण्यामागे वैयक्तिक कारणे आहेत. माझ्या खासगी आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या मला सर्वजनिक करायच्या नाहीत.  
 

Web Title: Mahie gill confirms about marrying actor entrepreneur ravi kesar know more details here