महेश मांजरेकर झळकणार साहोमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 14:44 IST2017-09-09T09:14:20+5:302017-09-09T14:44:20+5:30

महेश मांजरेकरने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील एक दिग्गज कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले ...

Mahesh Manjrekar will be seen in the show | महेश मांजरेकर झळकणार साहोमध्ये

महेश मांजरेकर झळकणार साहोमध्ये

ेश मांजरेकरने आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीतील एक दिग्गज कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केवळ एक कलाकार म्हणूनच नव्हे तर एक लेखक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी वॉटेंड, रज्जो, हिम्मतवाला यांसारख्या हिंदी चित्रपटात साकारलेल्या भूमिकांचे देखील प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले आहे. हिंदीमध्ये ते खूप कमी काम करत असले तरी अतिशय चांगल्या भूमिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
महेश मांजरेकर यांनी २०१५ साली प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात शाहुजी राजे भोसले ही व्यक्तिरेखा साकारली होती. पण गेल्या दोन वर्षांपासून ते हिंदी चित्रपटात झळकले नाहीत. दरम्यानच्या काळात ते एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड या त्यांच्या मराठी चित्रपटात व्यग्र होते. तसेच त्यांनी दाक्षिणात्य आणि बंगाली चित्रपटातही काम केले. आता दोन वर्षांनंतर ते हिंदी चित्रपटांकडे वळले आहेत. 
बाहुबली फेम प्रभास साहो या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात श्रद्धा कपूर, नील नीतीन मुकेश, चंकी पांडे आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात महेश मांजरेकर देखील एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
हिंदी इंडस्ट्रीत शिस्त नसल्याने मी हिंदी इंडस्ट्रीपासून दूर राहाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी सीएनक्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळेच महेश मांजरेकर प्रेक्षकांना अलीकडच्या काळात हिंदी चित्रपटात खूपच कमी पाहायला मिळत आहेत. 

Also Read : ​‘मराठी चित्रपटापुढे हिंदीसह तेलगुचेही आव्हान’

Web Title: Mahesh Manjrekar will be seen in the show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.