"कोणत्याही दिखाऊपणापेक्षा...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:15 IST2026-01-30T18:12:43+5:302026-01-30T18:15:04+5:30

"काही कलाकार या गोंगाटापासून दूर जाऊन...", अरिजीतच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट यांची प्रतिक्रिया, शेअर केली 'आशिकी २' ची आठवण 

mahesh bhatt reaction on arijit singh retirement from playback singing remember her first meeting | "कोणत्याही दिखाऊपणापेक्षा...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट काय म्हणाले?

"कोणत्याही दिखाऊपणापेक्षा...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट काय म्हणाले?

Mahesh Bhatt Reaction on Arijit Singh Retirement: बॉलिवूडमधली लोकप्रिय गायक अरिजीत सिंह मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. 'तुम ही हो', 'केसरिया' तसेच 'हमारी अधुरी कहाणी' यांसारखी गाणी त्याने गायली आहे. मात्र, आता यापुढे सिनेमांसाठी पार्श्वगायन करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्या चाहत्यांना  मोठा धक्का बसला. त्याच्या या निर्णयावर  संगीत क्षेत्रातील दिग्गजांसह अनेकजण मतं व्यक्त करत आहेत. अशातच आता दिग्दर्शक महेश भट यांनी या प्रतिक्रिया दिली आहे.

अरिजीत सिंहने केवळ हिंदीच नाही तर बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषांत ३०० हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्याने अचानक पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु होती. द टेलिग्राफ ऑनलाइनशी बोलताना, महेश भट यांनी अरिजित सिंगच्या पार्श्वगायन सोडण्याच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "प्रसिद्धीच्या शिखरावर असताना काही कलाकार या गोंगाटापासून दूर जाणं पसंत करतात. कोणत्याही दिखाऊपणापेक्षा ते शांतता, एकांत आणि सत्याचा मार्ग निवडतात.अरिजीत सिंहनेही तेच केलं."

'आशिकी २' च्या भेटीदरम्यानचा किस्सा शेअर करत ते म्हणाले...

"आम्ही 'आशिकी २' च्या सेटवर पहिल्यांदा भेटलो होतो. मी त्या चित्रपटाचा निर्माता होतो. त्यावेळी आम्ही गाणी बनवत होतो आणि तेव्हा अरिजीत सिंहला 'तुम ही हो' गाण्याची ऑफर देण्यात आली होती.  त्यावेळी एक लाजाळू आणि नम्र तरुण स्टेजवर आला आणि त्याने आपल्या गायनाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केलं.  शिवाय ते गाणं सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या रोमँटिक गाण्यांपैकी एक बनलं.तो क्षण त्याच्या आयुष्यात इतका महत्त्वाचा टप्पा ठरला. " असं वक्तव्य त्यांनी मुलाखतीत केलं. 

अरिजीतने पार्श्वगायनातून घेतली निवृत्ती

काही दिवसांपूर्वीच अरिजीतने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण यापुढे चित्रपटांसाठी गाणी गाणार नसल्याचे जाहीर केले होते. "मी आता थांबत आहे," अशा शब्दांत त्याने आपल्या प्रदीर्घ आणि यशस्वी प्ले बॅक सिंगिंग प्रवासाला पूर्णविराम दिला होता. तेव्हापासूनच तो भविष्यात काय करणार, याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Web Title : अरिजीत सिंह की सेवानिवृत्ति पर महेश भट्ट: शोहरत से शांति बेहतर।

Web Summary : महेश भट्ट ने अरिजीत सिंह की सेवानिवृत्ति पर टिप्पणी की, 'आशिकी 2' की मुलाकात को याद किया। उनका मानना है कि अरिजीत ने शोहरत के शोर से शांति को चुना, और अपने चरम पर अन्य कलाकारों की तरह शांति और सच्चाई का रास्ता चुना।

Web Title : Mahesh Bhatt on Arijit Singh's retirement: Choosing peace over fame.

Web Summary : Mahesh Bhatt commented on Arijit Singh's retirement, recalling their 'Aashiqui 2' meeting. He believes Arijit chose peace over the noise of fame, opting for a path of tranquility and truth, similar to other artists at their peak.