महेश भट हॉस्पिटलमध्ये असल्याचा मेसेज व्हायरल झाला; कुटुंबीय म्हणाले, 'ही निव्वळ अफवा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 17:34 IST2020-08-21T17:27:57+5:302020-08-21T17:34:22+5:30
महेश भट यांना ह्रदय विकाराचा झटका आला आहे आणि त्यानंतर त्याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

महेश भट हॉस्पिटलमध्ये असल्याचा मेसेज व्हायरल झाला; कुटुंबीय म्हणाले, 'ही निव्वळ अफवा'
सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी सीबीआयने सुरु केली आहे. याच दरम्यान महेश भट यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अशी बातमी समोर आली होती. मात्र ही बातमी खरी नाही. सोशल मीडियावर काही ट्विट्स समोर आले होते ज्यात दावा करण्यात आला होता की महेश भट यांना ह्रदय विकाराचा झटका आला आहे आणि त्यानंतर त्याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सीबीआय चौकशी टाळण्यासाठी ते हे सगळं करत असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर सुरु झाली. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, महेश भट यांच्या कुटुंबीयांचं स्टेटमेंट समोर आले आहे. त्यांनी महेश भट हे पूर्णपणे ठिक असल्याचे सांगत ते हॉस्पिटलमध्ये नाही घरीच आहेत.
अलिकडेच अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटींग समोर आलं आहे. या दोघांमध्ये झालेल्या संवादावरून हे कुठेतरी स्पष्ट होतंय की, रियाने स्वत: सुशांतसोबतचं नातं तोडलं होतं. तसेच रिया आणि महेश भट्ट यांच्यातील चॅटींग याकडेही इशारा करतं की, रिया चौकशीत पोलिसांना सगळं काही स्पष्ट सांगत नाहीये. अशीही चर्चा आहे की, रिया पोलिसांसोबत खोटं बोलत आहे.