सल्यूट! Mahesh Babu ने केलं दिलदार काम, हार्ट सर्जरीसाठी मदत करून वाचवला ३० मुलांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 13:02 IST2022-04-09T13:00:33+5:302022-04-09T13:02:25+5:30
Mahesh Babu : तेलुगु सुपरस्टार महेश बाबू सुपरहिट सिनेमासोबतच आपल्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. सगळ्यांनाच त्याचा दिलदारपणा माहीत आहे.

सल्यूट! Mahesh Babu ने केलं दिलदार काम, हार्ट सर्जरीसाठी मदत करून वाचवला ३० मुलांचा जीव
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याचे फॅन्स त्याच्या सामाजिक कार्याचेही फॅन आहेत. दोन मुलांचा वडील असलेल्या महेश बाबूची पर्सनॅलिटी इतरांपेक्षा फार वेगळी आहे. महेश बाबूने त्याच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कितीतरी अनाथ आणि बेवारस मुलांची मदत करतो. नुकत्याच होऊन गेलेल्या वर्ल्ड हेल्थ डे ला त्याने ३० पेक्षा जास्त मुलांचा जीव वाचवला आहे.
३० मुलांची बायपास सर्जरी
तेलुगु सुपरस्टार महेश बाबू सुपरहिट सिनेमासोबतच आपल्या दिलदारपणासाठीही ओळखला जातो. सगळ्यांनाच त्याचा दिलदारपणा माहीत आहे. तो पीडित मुलांच्या हृदयाची सर्जरी करण्यासाठी मदत करत असतो. अभिनेत्याने आध्रं हॉस्पिटल, विजयवाडा आणि महेश बाबू फांउडेशनच्या डॉक्टरांच्या मदतीने ३० मुलांच्या हृदयाची सर्जरी केली गेली. महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर आंध्र प्रदेशे राज्यपाल बिस्वा भूषण हरिचंदन यांचे हे आयोजन सुविधाजनक करण्यासाठी धन्यवाद दिले.
नम्रता शिरोडकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं की, 'वर्ल्ड हेल्थ डे च्या निमित्ताने ३० मुलांच्या हृदयाची सर्जरी केली'. नम्रताने यावेळचे काही फोटोही शेअर केले आहेत.
महेश बाबूने २०१९ मध्ये आंध्रा हॉस्पिटल आणि हीलिंग लिटिल हार्ट्स नावाच्या एनजीओसोबत काम सुरू केलं. त्याने आतापर्यंत १००० मुलांची सर्जरी स्पॉन्सर केली आहे. गरीब मुलांच्या सर्जरीसोबतच महेश बाबू वेगवेगळी सामाजिक कामे करतो. त्याने २०१६ मध्ये आंध्रातील बरीपालम आणि तेलंगणातील सिद्धापुरम गावे दत्तक घेतली आहेत. या गावांचा त्याने बराच विकास केला. गावातील लोक त्याला देवासारखं पूजतात.
काही दिवसांपूर्वीच महेश बाबूचं फाउंडेशन एका नव्या उपक्रमासाठी रेनबो चिल्ड्रन हार्ट इन्स्टिट्यूटसोबत जुळलं. अभिनेत्याने मुलांसाठी कार्डियाक केअरसाठी आरसीएचआयमध्ये प्योर लिटिल हार्ट फाउंडेशन लॉन्च केलं. याद्वारे जन्मताच हृदय रोग असलेल्या मुलांवर उपचार केले जातील.