महेश बाबू आणि रणवीर सिंग म्हणतायेत, आज कुछ तुफानी करते है
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 10:28 IST2020-02-26T10:28:08+5:302020-02-26T10:28:22+5:30
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूडस्टार रणवीर सिंग हे मुंबईत एका जाहिरातीचे शूटिंग करताना एकत्र दिसले.

महेश बाबू आणि रणवीर सिंग म्हणतायेत, आज कुछ तुफानी करते है
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूडस्टार रणवीर सिंग हे मुंबईत एका जाहिरातीचे शूटिंग करताना एकत्र दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार शूटिंगच्या ठिकाणी ते एकमेकांना सहकार्य करायचे. दोघे थॅम्सअॅपच्या जाहिरातीसाठी एकत्र आले होते. फोटोत दोघांनी काळ्या रंगाचे रेसरचे ड्रेस परिधान केलेले आहेत. दोघे या ड्रेसमध्ये खूपच स्मार्ट दिसतायेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होतायेत.
सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच रणवीर सिंग आणि महेशबाबूला एकत्र घेऊन साजिद नाडियाडवाला सिनेमा करण्याच्या तयारीत आहे. रणवीर आणि महेशबाबूच्या फॅन्ससाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असेल. दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुर असतील.
रणवीर सिंगचा '83' सिनेमामधील लूक आऊट झाला आहे. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे तर दीपिकारोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे. या पोस्टरमध्ये दीपिकाचा लूक खूप छान वाटत आहे. त्यामुळे तिला रोमी देव यांच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. 10 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.