महाकुंभमधील मोनालिसाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक, व्हिडीओ पाहून हैराण झाले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:16 IST2025-02-04T11:15:18+5:302025-02-04T11:16:38+5:30
Viral Girl Monalisa : महाकुंभ २०२५ मध्ये माळा विकण्यासाठी आलेली मध्य प्रदेशातील मोनालिसा एका रात्रीत सोशल मीडियावर स्टार झाली. तिच्या निळ्या डोळ्यांमुळे ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

महाकुंभमधील मोनालिसाचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक, व्हिडीओ पाहून हैराण झाले चाहते
महाकुंभ २०२५ मध्ये माळा विकण्यासाठी आलेली मध्य प्रदेशातील मोनालिसा (Viral Girl Monalisa) एका रात्रीत सोशल मीडियावर स्टार झाली. तिच्या निळ्या डोळ्यांमुळे ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अलीकडेच मोनालिसालाही एका चित्रपटाची ऑफर आली आहे. मोनालिसा प्रसिद्ध झाल्यापासून तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ज्यामध्ये मोनालिसा वेस्टर्न आउटफिटमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती वेस्टर्न कपड्यांमध्ये स्टाईलमध्ये चालताना आणि डान्स करताना दिसत आहे. तिचे हे व्हायरल होणारे हे व्हिडीओ खरे आहेत का, हे जाणून घेऊयात.
खेरतर, हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर "ni8.out9" नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. एआय तंत्रज्ञानाद्वारे व्हिडिओमध्ये मोनालिसाचा चेहरा जोडून एक डीपफेक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये ती वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसत असून ती खूपच स्टायलिश दिसत असली तरी प्रत्यक्षात हा एक फेक व्हिडिओ आहे. मोनालिसाचे असे अनेक डीपफेक व्हिडिओही इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमध्ये कधी ती समुद्राच्या किनाऱ्यावर नाचताना तर कधी ती स्टायलिश कपड्यांमध्ये फिरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर युजर्स कमेंट करत आहेत. काही लोक याला मजेशीर म्हणत आहेत, तर काही जण याला फसवणुक म्हणत आहेत. व्हिडीओचे सत्य समोर आल्यानंतर अनेक यूजर्सना समजू शकले नाही की सोशल मीडियावर असा व्हायरल कंटेंट कसा व्हायरल होतो. मोनालिसाच्या या व्हायरल व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केले की, सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल झाली की, त्याचा किती मोठा परिणाम होऊ शकतो. आता या व्हिडिओवर मोनालिसा काय प्रतिक्रिया देते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.