माधुरी-नाना एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 09:06 IST2016-02-19T16:04:53+5:302016-02-19T09:06:11+5:30
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि ‘नटसम्राट’ नाना पाटेकर लवकर एका सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहे. बी-टाऊनमध्ये अशी ...

माधुरी-नाना एकत्र?
ब लिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि ‘नटसम्राट’ नाना पाटेकर लवकर एका सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहे.
बी-टाऊनमध्ये अशी चर्चा आहे की, मल्याळम चित्रपट ‘सॉल्ट-एन-पेपर’च्या हिंदी रिमेकमध्ये दोघे झळकणार आहेत.
२०११ साली प्रदर्शित झालेला ‘सॉल्ट-एन-पेपर’ हा कॉमेडी चित्रपट आहे. ‘कालीदासन’ आणि ‘माया’ या दोन पात्रांची ही कहाणी असून राँग नंबरमुळे दोघांची भेट होते आणि खाद्यपदार्थांच्या कॉमन आवडीमुळे दोघांत प्रेम फुलते, अशी थोडक्यात कथा आहे.
नाना आणि माधुरीने यापूर्वी ‘वजूद’ (1998), ‘प्रहार’ (1991), ‘परिंदा’ (1989), आणि ‘मोहरे’ (1987) अशा चार चित्रपटांत सोबत काम केलेले आहे.
![prahar]()
सुमारे दोन दशकानंतर पुन्हा एकदा दोघांना चंदेरी पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहत्यांना नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही.