माधुरी दीक्षित आणि या क्रिकेटरच्या अफेअरची झाली होती चर्चा, या कारणामुळे आला नात्यात दुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 14:50 IST2020-05-15T14:40:13+5:302020-05-15T14:50:03+5:30
माधुरी प्रसिद्धीझोतात असताना एका क्रिकेटरसोबतच्या तिच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्या क्रिकेटरसोबत ती लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते.

माधुरी दीक्षित आणि या क्रिकेटरच्या अफेअरची झाली होती चर्चा, या कारणामुळे आला नात्यात दुरावा?
माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या. माधुरीचा आज वाढदिवस असून गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करतेय. ती अधिकाधिक वेळ तिच्या कुटुंबियांना देते. तिचे लग्न डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत झाले असून तिला दोन मुलं आहेत. तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला अनेकवेळा तिचे तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो पाहायला मिळतात. माधुरी प्रसिद्धीझोतात असताना एका क्रिकेटरसोबतच्या तिच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. त्या क्रिकेटरसोबत ती लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते.
हा क्रिकेटर अजय जडेजा असून अजय आणि माधुरीची ओळख एका मासिकाच्या फोटोशूटच्यावेळी झाली होती. त्या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले असे म्हटले जाते. त्या काळात माधुरी प्रचंड प्रसिद्ध होती. पण त्याचसोबत अजय देखील त्याच्या भारतीय क्रिकेटमधील कारकिर्दीमुळे प्रचंड फेमस होता. अजय आणि माधुरीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले असताना अजयला बॉलिवूडमध्ये संधी देण्यासाठी ती प्रयत्न देखील करत असल्याच्या बामत्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. काही वर्षांनंतर त्याने बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण तोपर्यंत अजय आणि माधुरीच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
अजय जडेजाचे नाव मॅच फिक्सिंग मध्ये आल्यानंतर अजय आणि माधुरी यांच्या नात्यात दुरावा आला असे म्हटले जाते. या दोघांच्या अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा झाली असली तरी या दोघांनी यावर मीडियात न बोलणेच पसंत केले होते.