माधुरी दीक्षितने शिकविला वरुण-आलियाला डान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 20:01 IST2017-02-10T14:31:19+5:302017-02-10T20:01:19+5:30
संजय-माधुरीच्या ‘तम्मा तम्मा’ केमेस्ट्रीला आलिया व वरुण मागे टाकतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

माधुरी दीक्षितने शिकविला वरुण-आलियाला डान्स!
ब लिवूडचा नटखट ब्वॉय अभिनेता वरुण धवन व बबली गर्ल आलिया भट्ट यांचा आगामी ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ हा चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यावर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. यातच या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले. या गाण्याला आतापर्यंत १ कोटी लोकांनी पाहिले आहे. बद्रिनाथ...चे दुसरे गाणे रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटासंबंधीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यात अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ‘ब्रद्रिनाथ...’ची जोडी आलिया भट्ट व वरुण धवन यांना डान्स शिकवित असल्याचे दिसते आहे.
आलिया भट्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या व्हिडीओतून हा खुलासा झाला आहे. ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’मध्ये संजय दत्त व माधुरी दीक्षित यांच्या ‘थानेदार’ या चित्रपटातील तम्मा तम्मा लोगे हे गाणे रिमिक्स करण्यात आले आहे. ओरिजनल गाण्यात माधुरी व संजय दत्त यांनी जबरदस्त डान्स केला होता. त्यावेळी हे गाणे सुपरहिट ठरले होते. या गाण्यात दाखविण्यात आलेल्या डान्सप्रमाणेच ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’मध्ये डान्स स्टेप्स असणार आहे. ‘तम्मा तम्मा’च्या रिमिक्ससाठी आलिया व वरुणने थेट माधुरीची मदत घेतली.
माधुरी दीक्षितच्या जबरदस्त डान्स परर्फामन्स ‘तम्मा तम्मा’ या गाण्यात पहायला मिळतो. माधुरी आपल्या डान्ससाठी आजही ओळखली जाते. अशावेळी तिच्याच चित्रपटातील गाण्याचा रिमिक्स होत असताना माधुरीची मदत होणे अपेक्षितच होते. माधुरीने देखील यात आपली रुची दाखवित वरुण व आलिया यांना डान्स शिकविला. हा व्हिडीओ पाहिल्यावर सुरुवातीला या गाण्याच्या स्टेप्स दोघांना समजत नसल्याचे दिसते. मात्र माधुरीने दिलेल्या इंस्ट्रक्शन्सनंतर दोघांनी कसा डान्स केला आहे लवकरच कळेल. माधुरीच्या या मदतीसाठी निर्माता करण जोहर याने आभार मानले आहे. १० मार्चला प्रदर्शित होत असलेल्या बद्रिनाथ की दुल्हनीयामधील तम्मा तम्मा रिमिक्स लवकर प्रदर्शित केला जाणार आहे. संजय-माधुरीच्या ‘तम्मा तम्मा’ केमेस्ट्रीला आलिया व वरुण मागे टाकतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सध्या चित्रपटातून रिमिक्स गाण्याची चलन आले आहे असेच म्हणावे लागले. या वर्षीचा पहिला सुपरहिट ठरलेला ‘काबिल’ व पहिला बिगबजेट असलेला ‘रईस’ या दोन्ही चित्रपटातील रिमिक्स व्हर्जन चांगलेच हिट ठरले आहे.
![]()