मॉम, मम्मी की आई... माधुरी दीक्षितची मुलं तिला काय नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:57 IST2025-07-24T12:33:59+5:302025-07-24T12:57:50+5:30
माधुरी दीक्षितला मुलं काय म्हणतात? जाणून घ्या...

मॉम, मम्मी की आई... माधुरी दीक्षितची मुलं तिला काय नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही म्हणाल...
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित ही मुळची मराठी असली तरी तिने बॉलिवूडवर राज्य केले. प्रेक्षकांवरील माधुरी दीक्षितची मोहिनी कायम आहे. आजही भल्याभल्यांना माधुरीच्या सौंदर्याची भुरळ पडते. अनेक नवोदित अभिनेत्री माधुरीलाच आपला आदर्श मानतात. केवळ अभिनयातच नाही तर नृत्यातही ती पारंगत आहे. फक्त एवढेच नाही तर माधुरी दीक्षित एक आदर्श आई म्हणूनही ओळखली जाते. माधुरीला रायन आणि अरिन ही दोन मुले आहेत. अरिन आणि रायन यांच्यावरील मराठमोळ्या संस्कारांचं देखील सोशल मीडियावर कायम कौतुक केलं जातं. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
अलिकडेचं माधुरीचे पती डॉ. नेने आणि अरिन-रायन यांनी मिळून माधुरीला नामांकित ब्रँडचे स्किन केअर प्रोडक्ट्स भेट म्हणून दिलेत. अरिन-रायन यांनी या गिफ्टवर माधुरीसाठी खास मेसेज देखील लिहिला. या मेसेजमध्ये दिसलं की माधुरीची दोन्ही मुलं तिला मॉम, मम्मी नाही तर 'आई' अशी हाक मारतात. माधुरीच्या मुलांनी त्या गिफ्ट पेपरवर लिहलं होतं, "खास आमच्या आईसाठी... आमच्याकडून तुला ही गोड भेटवस्तू". विशेष म्हणजे 'आई' असं मराठीत लिहिलं असल्याचं दिसलं. अमेरिकेत वाढलेल्या तिच्या दोन्ही मुलांवरील संस्कार पाहून पुन्हा एकदा माधुरीचं कौतुक होतंय.
माधुरीचं कमबॅक...
माधुरीने यशाच्या शिखरावर असताना डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं होतं. हे लग्न अमेरिकेमध्येच झालं आणि त्यानंतर माधुरीनं बॉलिवूडपासून ब्रेक घेतला पतीसोबत अमेरिकेतच स्थायिक झाली. तिच्या दोन्ही मुलांचं शिक्षण परदेशात पूर्ण झालं आहे. अमेरिकेतच अरिन-रायन हे लहानाचे मोठे झालेत. माधुरीनं आपल्या दोन्ही मुलांवर मराठमोळे संस्कार केलेत. काही वर्षांपुर्वी माधुरी भारतात परतली आहे. तिच्या कमबॅकनंतर सगळ्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. भारतात आल्यावर माधुरीने पुन्हा एकदा तिचा सिनेविश्वातील प्रवास सुरू केलाय. अनेक डान्स शोजमध्ये अभिनेत्रीने परीक्षक म्हणून जबाबदारी देखील सांभाळली आहे.