'या' रोजच्या सवयी आरोग्याचं नुकसान करतायत, माधुरीचे पती डॉ. नेनेंचा धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 11:42 IST2025-06-08T11:42:07+5:302025-06-08T11:42:19+5:30

माधुरी दीक्षित यांच्या पतीचा Video व्हायरल, रोजच्या सवयींबाबत केला धक्कादायक खुलासा!

Madhuri Dixit Husband Dr Nene Reveals Scary Truth Behind Normal Habits Video Viral | 'या' रोजच्या सवयी आरोग्याचं नुकसान करतायत, माधुरीचे पती डॉ. नेनेंचा धक्कादायक खुलासा!

'या' रोजच्या सवयी आरोग्याचं नुकसान करतायत, माधुरीचे पती डॉ. नेनेंचा धक्कादायक खुलासा!

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अनेक सवयी आत्मसात केलेल्या असतात, काही चांगल्या, तर काही नकळत आरोग्यावर विपरित परिणाम करणाऱ्या. विशेष म्हणजे या सवयींचं गांभीर्य लक्षात आणून दिलंय खुद्द अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि सुप्रसिद्ध हृदयतज्ज्ञ डॉ. श्रीराम नेने यांनी. अलीकडेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर करत, रोजच्या आयुष्यातील काही 'सामान्य' वाटणाऱ्या सवयी आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतात, याविषयी सविस्तर भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले आहेत डॉ. नेने? आणि कोणत्या सवयींपासून आपण सावध राहायला हवं? चला जाणून घेऊया सविस्तर.

माधुरी दीक्षितचे पती म्हणजेच डॉ. श्रीराम यांचं स्वत:च युट्यूब चॅनेल आहे. आता नुकतंच त्यांनी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतच्या लोकांच्या एकूण दिनचर्येबद्दलचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणतात, "सकाळी वारंवार स्नूझ अलार्म लावल्याने गाढ झोपेचा विघात होतो. अशा प्रकारे झोप खंडित झाल्यास शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.  असा अलार्म लावणे टाळा, नीट झोपा आणि नीट उठा".

डॉ. नेने यांनी झोपेच्या आधी मोबाइल वापरण्याबाबतही इशारा दिला. त्यांच्या मते, मोबाइल वापरण्यामुळे मेंदूमध्ये डोपामिनची पातळी वाढते, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो. तसंच मोबाइलमधून मिळणाऱ्या माहितीमुळे सकाळी नकारात्मकतेचं वातावरण तयार होऊ शकतं. त्यामुळे सकाळचा मोबाईल वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

पुढे व्हिडीओमध्ये त्यांनी "जेवण लवकर आणि घाईघाईने करणं टाळा", असं स्पष्टपणे सांगितलं. मेंदूला पोट भरल्याचं कळण्यासाठी २०-३० मिनिटे लागतात, त्यामुळे घाईने जेवल्यास आपण जास्त खाऊन टाकतो. यामुळे वजन वाढ, अपचन आणि साखरेच्या पातळीतील बदल यांसारख्या समस्या होऊ शकतात. जेवताना लक्ष विचलित होणारं काही पाहू नये आणि अन्न नीट चावून खावं, हे त्यांनी अधोरेखित केलं आहे. डॉ. नेने यांचा हा व्हिडीओ सामान्य वाटणाऱ्या पण आरोग्यावर मोठा परिणाम करणाऱ्या सवयींविषयी सजगता निर्माण करणारा आहे

Web Title: Madhuri Dixit Husband Dr Nene Reveals Scary Truth Behind Normal Habits Video Viral