‘दयावान’मध्ये विनोद खन्नाबरोबर बोल्ड सीन्स दिल्याचा माधुरी दीक्षितला झाला होता पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 16:11 IST2017-04-27T10:41:14+5:302017-04-27T16:11:14+5:30

आजच्या काळात चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स सामान्य बाब आहे. मात्र ९० च्या दशकात चित्रपटांमध्ये लिप लॉक सीन्स शूट करणे खूपच ...

Madhuri Dixit had given a bold sequence with 'Vinod Khanna' in 'Dayavan'! | ‘दयावान’मध्ये विनोद खन्नाबरोबर बोल्ड सीन्स दिल्याचा माधुरी दीक्षितला झाला होता पश्चाताप!

‘दयावान’मध्ये विनोद खन्नाबरोबर बोल्ड सीन्स दिल्याचा माधुरी दीक्षितला झाला होता पश्चाताप!

च्या काळात चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स सामान्य बाब आहे. मात्र ९० च्या दशकात चित्रपटांमध्ये लिप लॉक सीन्स शूट करणे खूपच मोठी बाब समजली जात होती. जर बॉलिवूडमधील बोल्ड चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या ‘दयावान’ या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला जातो. १९८८ ची ही गोष्ट आहे. जेव्हा माधुरी आणि विनोद यांच्यात अतिशय बोल्ड सीन्स शूट करण्यात आले होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, लोक फक्त या दोघांमधील बोल्ड सीन्स बघण्यासाठीच सिनेमागृहांमध्ये गर्दी करीत होते. मात्र काही वर्षांनंतर माधुरी मात्र या चित्रपटामुळे खूपच निराश झाली होती. विनोदबरोबर तिने दिलेल्या बोल्ड सीन्सचा तिला पश्चाताप होत होता. 



वास्तविक विनोद खन्ना संन्यासी जीवन सोडून पुन्हा बॉलिवूडमध्ये परतले होते. त्यामुळे ते अशाप्रकारच्या बोल्ड चित्रपटातून परतील, असा कोणालाही विश्वास नव्हता. त्यावेळी फिरोज खान ‘दयावान’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. विनोद आणि फिरोज यांच्यात ‘कुर्बानी’ या चित्रपटापासून मैत्री फुलली होती. त्यामुळे फिरोज यांनी विनोदला ‘दयावान’साठी लीड रोल आॅफर केला होता. विनोद यांनी लगेचच त्यास होकारही दिला. मात्र अभिनेत्रीचा शोध सुरू असल्याने विनोद यांच्या अपोझिट कोण असेल याविषयी उत्सुकता होती. कारण त्याकाळातील प्रसिद्ध अभिनेत्रींनी या चित्रपटात भूमिका साकारण्यास सपशेल नकार दिला होता. कारण यामध्ये अभिनेत्रीची भूमिका लहान आणि वेश्येची होती. 



जेव्हा सगळ्या अभिनेत्रींनी नकार दिला होता, तेव्हा फिरोजने माधुरी दीक्षित हिच्याशी संपर्क साधला. माधुरीनेदेखील विनोद वयाने मोठे असल्याने होकार देण्यास विलंब केला. मात्र अखेर ती ही भूमिका साकारण्यास तयार झाली. त्यामुळे फिरोज यांचा अभिनेत्रीचा शोधही संपला होता. मात्र त्यांच्या अडचणी कमी झाल्या असे नव्हते, तर आता त्यांच्या अडचणीत खºया अर्थाने वाढ होणार होती. 



फिरोज यांनी चित्रपटाची शूटिंग सुरू केली होती. विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्यात एक लिप लॉक आणि एक इंटिमेट सीन्स चित्रित करायचा होता. लोकांना असे वाटत होते की, माधुरी यास तयार होणार नाही. मात्र माधुरीने आपल्यापेक्षा वयाने २० वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या विनोद यांच्याबरोबर हे सीन्स करण्यास होकार दिला. माधुरीच्या या होकाराने सगळ्यांनाच धक्का बसला होता. पुढे जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा चित्रपटाच्या कथा किंवा अभिनयापेक्षा विनोद खन्ना आणि माधुरी यांच्यातील इंटीमेट सीन्सचीच अधिक चर्चा रंगली होती. 



प्रेक्षक फक्त दोघांमधील हॉट सीन्स बघण्यासाठी सिनेमागृहात हजेरी लावत असत. त्याचबरोबर माधुरीच्या धाडसाचेही कौतुक करीत असत. परंतु माधुरी मात्र या सीन्समुळे स्वत:ला खूपच अनकम्फर्ट समजायली लागली. या चित्रपटाच्या रिलीजच्या तीन-चार वर्षांनंतर माधुरीने एका मुलाखतीत मान्य केले होते की, ‘दयावान’मध्ये तिने दिलेले इंटीमेट सीन्स खूपच निराशाजनक होते. मला आजही पश्चाताप होत आहे की, मी या भूमिकेसाठी नकार देऊ शकले नाही. मला हा चित्रपट करायला नको होता, असे तिने म्हटले होते. 

Web Title: Madhuri Dixit had given a bold sequence with 'Vinod Khanna' in 'Dayavan'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.