इमरान हाश्मी आणि माधुरीचा रोमॅंटिक डान्स व्हिडीओ व्हायरल, दोघांची केमिस्ट्री पाहूल व्हाल फिदा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 14:26 IST2020-10-31T14:23:21+5:302020-10-31T14:26:34+5:30

माधुरीने इंडस्ट्रीतील अनेक रोमॅंटिक हिरोंसोबत रोमान्स केलाय. पण इमरान हाश्मीसोबत सिनेमा केला नाही. पण या व्हिडीओत दोघांची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

Madhuri Dixit dance with Emraan Hashmi on pee loon song video viral on internet | इमरान हाश्मी आणि माधुरीचा रोमॅंटिक डान्स व्हिडीओ व्हायरल, दोघांची केमिस्ट्री पाहूल व्हाल फिदा...

इमरान हाश्मी आणि माधुरीचा रोमॅंटिक डान्स व्हिडीओ व्हायरल, दोघांची केमिस्ट्री पाहूल व्हाल फिदा...

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आजही आपल्या डान्स आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते. माधुरीने अभिनयासोबतच आपल्या बहारदार डान्सने इंडस्ट्रीत मोठी ओळख मिळवली आहे. तिचे वेगवेगळे डान्स व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची खासियत म्हणजे यात ती इमरान हाश्मीसोबत रोमान्स करताना दिसत आहे. माधुरीने इंडस्ट्रीतील अनेक रोमॅंटिक हिरोंसोबत रोमान्स केलाय. पण इमरान हाश्मीसोबत सिनेमा केला नाही. पण या व्हिडीओत दोघांची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

इमरान हाश्मीच्या 'पी लू' या सुपरहिट गाण्यावर दोघांता हा परफॉर्मन्स सध्या चर्चेचा विषय  ठरतो आहे. दोघांचा हा व्हिडीओ 'डान्स स्वॅग'नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. दोघांचा रोमान्स पाहून समोर  बसलेला करण जोहरही हैराण होतो. दोघांच्या या व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक भरभरून दोघांवर कमेंटही करत आहेत.

माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्ससोबत जुळली आहे. ती नेहमीच तिचे खास व्हिडीओज आणि फोटोज शेअर करत असते. कामाबाबत सांगायचं तर ती कलंक आणि टोटल धमाल सिनेमात दिसली होती. टोटल धमालमध्ये तिने अनिल कपूरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यासोबतच ती डान्स दिवाने शोची जजही होती. 
 

Web Title: Madhuri Dixit dance with Emraan Hashmi on pee loon song video viral on internet