मिस्टर नेनेंचा ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत धम्माल डान्स, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 17:31 IST2022-02-13T17:30:22+5:302022-02-13T17:31:13+5:30
Madhuri Dixit And Husband Shriram Nene Dance Video : बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित सध्या भलेही सिनेमात फार अॅक्टिव्ह नाही. तूर्तास माधुरीच्या एका व्हिडीओची चर्चा होतेय. या व्हिडीओत माधुरी पती श्रीराम नेने यांच्यासोबत थिरकताना दिसतेय.

मिस्टर नेनेंचा ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत धम्माल डान्स, पाहा व्हिडीओ
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit )सध्या भलेही सिनेमात फार अॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. या ना त्या कारणाने माधुरी सतत चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय आहे. तूर्तास माधुरीच्या एका व्हिडीओची चर्चा होतेय. या व्हिडीओत माधुरी पती श्रीराम नेने (Shriram Nene) यांच्यासोबत थिरकताना दिसतेय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ श्रीराम नेने यांच्या नुकत्याच झालेल्या बर्थ डे पार्टीचा असल्याचा दावा केला जातोय. यात माधुरी व श्रीराम ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातील ‘तम्मा तम्मा अगेन’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दिग्दर्शक व कोरिओग्राफर फराह खान हिने या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ‘हॅपी बर्थ डे राम, तू माधुरीला सीरिअस कॉम्पिटीशन देत आहेस,’ असं फराहने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं आहे.
माधुरी लॉस एंजेलिसला भावाला भेटायला गेली असता तिथं तिची भेट श्रीराम नेने यांची भेट झाली होती. माधुरी ही बॉलिवूडची इतकी मोठी स्टार अभिनेत्री आहे याबद्दल श्रीराम यांना किंचितही माहिती नव्हती. यानंतर त्यांच्या भेटी- गाठी होत गेल्या आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला
माधुरीनं लग्नाचा निर्णय घेतला, तेव्हा तिचं करिअर जोमात सुरू होतं. तिच्या हातात अनेक नवे प्रकल्प होते. अशा परिस्थितीत माधुरी हवाई येथे दहा दिवसांचा हनिमून आटोपून भारतात परतली आणि सर्व प्रकल्प पूर्ण केले. त्यानंतर ती आपल्या पतीसमवेत अमेरिकेत स्थायिक झाली होती. अमेरिकेत जवळपास 12 वर्षे वास्तव्य केल्यानंतर माधुरी पुन्हा भारतात परतली आणि त्याच बरोबर तिने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. माधुरी आणि श्रीराम यांना दोन मुलगे आहेत. अमेरिकेच्या प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. नेने मुंबईतील एका मनपा रुग्णालयात सेवा देत आहेत.