विनामेकअप दिसली माधुरी दीक्षित; कॅमेरा दिसताच लपविले तोंड, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 18:05 IST2017-02-17T12:34:13+5:302017-02-17T18:05:34+5:30

नेहमीच ग्लॅमरच्या झगमगाटात राहणारे कलाकार जेव्हा विनामेकअप बघावयास मिळतात तेव्हा त्यांच्या लुकवरून चांगलीच चर्चा रंगते. अर्थात ही चर्चा त्या ...

Madhukari Dixit looks vanishing; Face with hidden camera, see photo! | विनामेकअप दिसली माधुरी दीक्षित; कॅमेरा दिसताच लपविले तोंड, पहा फोटो!

विनामेकअप दिसली माधुरी दीक्षित; कॅमेरा दिसताच लपविले तोंड, पहा फोटो!

हमीच ग्लॅमरच्या झगमगाटात राहणारे कलाकार जेव्हा विनामेकअप बघावयास मिळतात तेव्हा त्यांच्या लुकवरून चांगलीच चर्चा रंगते. अर्थात ही चर्चा त्या स्टार्सना फारशी आवडणारी नसते. 



गेल्या बुधवारी धक धक गर्ल माधुरी दीक्षित पती डॉ. श्रीराम नेने याच्याबरोबर बांद्रा (मुंबई) येथे विनामेकअप बघावयास मिळाली अन् तिच्या दिसण्यावरून एकच चर्चा रंगली. काही मंडळींनी तर थेट कॅमेºयातच तिचा हा अवतार कैद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माधुरीची चांगलीच पंचाईतही झाली. कशीतरी तोंड लपवित ती तेथून निघून गेली. 



यापूर्वी जेव्हा-जेव्हा कलाकारांना विनामेकअप बघण्यात आले तेव्हा-तेव्हा त्यांच्यावरून चर्चा रंगली. आता यात माधुरीचाही समावेश झाला आहे. माधुरी जेव्हा या अवतारात बघण्यात आले तेव्हा ती खूपच वेगळी दिसत होती. शिवाय तिच्या अ‍ॅक्चुअल वयाचाही अंदाज बांधणे शक्य होत होते. मात्र आपले खरे वय कोणालाही समजू नये, हा नेहमीच सेलिब्रेटींचा अट्टहास राहिला असल्याने माधुरीने तिचा चेहरा लपविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जेव्हा तिला मीडिया फोटोग्राफर्स दिसले, तिने लगेचच चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र अशातही तिचे काही फोटोज् क्लिक केले गेले. 



येत्या मे महिन्यात ५० वर्षांची होणाºया माधुरीला २०१४ मध्ये आलेल्या ‘गुलाब गॅँग’ या सिनेमातून मोठ्या पडद्यावर बघण्यात आले होते. मात्र छोट्या पडद्यावर ती नेहमीच झळकत असल्याने तिच्या चाहत्यांमध्ये ती चर्चेत असते. काही रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती जज भूमिकेत असल्याने प्रेक्षकांना तिच्या अदा बघावयास मिळाल्या आहेत. थोडक्यात मोठा पडदा असो वा छोटा पडदा नेहमीच ती तिच्या चाहत्यांना बघावयास मिळते. 

Web Title: Madhukari Dixit looks vanishing; Face with hidden camera, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.