​ निक जोनास होणार का मधू चोप्रा यांचा जावई? काय म्हणते प्रियांकाची आई??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 12:35 IST2018-06-24T12:34:04+5:302018-06-24T12:35:31+5:30

 प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या भारतात आहेत. अमेरिकेतील प्रियांका व निकचे बहरते प्रेम आपण पाहिलेत. भारतातही या प्रेमाला ...

Madhu Chopra's son-in-law to play Nick Jonas? Priyanka's mother says? | ​ निक जोनास होणार का मधू चोप्रा यांचा जावई? काय म्हणते प्रियांकाची आई??

​ निक जोनास होणार का मधू चोप्रा यांचा जावई? काय म्हणते प्रियांकाची आई??

 
्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या भारतात आहेत. अमेरिकेतील प्रियांका व निकचे बहरते प्रेम आपण पाहिलेत. भारतातही या प्रेमाला उधाण आले आहे. निकला भारतात एकटे वाटू नये, इथपासून तर त्याला आपल्या मित्रांसोबत भेटवण्यापर्यंत काय काय सध्या प्रियांका करतेय. सर्वात आधी प्रियांकाने निकला आपल्या आईला व कुटुंबाला भेटवले. यानंतर या सर्वांसोबत प्रियांका व निक डिनरला गेलेत. दुस-याच दिवशी प्रियांकाने आपल्या घरी एक ग्रँण्ड हाऊस वार्मिंग पार्टी ठेवली. या पार्टीत तिने निकची सगळ्यांशी ओळख करून दिली. निक व प्रियांकाने मुंबईतील पावसाचीही मजा लुटली. (निकने प्रियांका मुंबईच्या पावसात भिजत असतानाचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.) लवकरच प्रियांका व निक गोव्यात हॉली डे एन्जॉय करायला जाणार असल्याचेही कळतेय. एकंदर काय तर प्रियांका व निक यांचे प्रेम ऐन बहरात आहे. आता अशात त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा सगळ्यांनाच असणार. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांना याबद्दल विचारले पण पण मधू यांनी मात्र याबद्दलचा प्रश्न शिताफीने टाळला.



मुलीची निवड कशी वाटली, असे मधू  यांना विचारले गेले. यावर, सध्या तरी याबद्दल सांगणे कठीण आहे, असे त्या म्हणाल्या. निक आणि आम्ही सगळे डिनरला गेलो होतो. पण आमच्यासोबत दहा जणांचा ग्रूप होता. त्यामुळे निकला फारसे जाणून घेता आलेच नाही. मी पहिल्यांदा त्याला भेटतेय. त्यामुळे इतक्या लवकर त्याच्याबद्दल कुठलेही मत बनवणे घाईचे आहे, असे मधू  चोप्रा म्हणाल्या.

ALSO READ : ​प्रियांका चोप्राचा कथित बॉयफ्रेंड निक जोनास भेटला तिच्या आईला... प्रियांकाच्या फॅन्सना लवकरच मिळणार गुड न्यूज?

मधू  चोप्राच्या आईचे म्हणणेही खरे आहे. निकने आपल्या भावी सासूबार्इंना अधिक वेळ देणे त्यामुळे गरजेचे आहे. आता हा वेळ निक कसा देतो आणि यानंतर मधू  चोप्रा यांचे त्याच्याबद्दल कसे मत बनते, ते बघूच.
 निक सध्या २५ वर्षांचा आहे तर प्रियांकाने पस्तिशी ओलांडलीय.  अगदी अलीकडे प्रियांका निकसोबत सुप्रसिद्ध डॉजर्स स्टेडियमवर दिसली होती. त्यांचा येथील एक व्हिडिओ एका प्रेक्षकाने सोशल मीडियावर लीक झाला होता. यानंतर प्रियांका व निक एका बोट पार्टीतही दिसले होते.
त्यांचा तेथील वावर बरेच काही सांगणारा होता. पण प्रियांकाची आई मधू यांनी या सगळ्या अफवा ठरवल्या होत्या. मी कुण्या विदेशीसोबत प्रियांकाच्या लग्नाची कल्पनाही करू शकत नाही. या सगळ्या अफवा आहेत. मीडिया काहीही लिहितो, असे त्यांनी म्हटले होते.

Web Title: Madhu Chopra's son-in-law to play Nick Jonas? Priyanka's mother says?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.