लेकी इतक्याच बोल्ड आहेत बॉलिवूडच्या या मॉम, फोटो पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 08:00 IST2020-03-09T08:00:00+5:302020-03-09T08:00:02+5:30

पाहा बॉलिवूडच्या या बोल्ड मॉम...

madhu chopra to neena gupta bollywood heroines bold mother look at the photos-ram | लेकी इतक्याच बोल्ड आहेत बॉलिवूडच्या या मॉम, फोटो पाहून व्हाल थक्क

लेकी इतक्याच बोल्ड आहेत बॉलिवूडच्या या मॉम, फोटो पाहून व्हाल थक्क

ठळक मुद्देपूजा बेदी 49 वर्षांची आहे आणि तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या बोल्ड आणि बिनधास्त अदा तुम्ही पाहताच. बॉलिवूडच्या सर्वच नट्या स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करताना जराही कचरत नाहीत. पण आज आम्ही या नट्यांच्या मॉमबद्दल सांगणार आहोत. बोल्डनेसच्या बाबतीत या मॉम लेकींपेक्षा जराही कमी नाहीत. यापैकी काही मॉमने साठी ओलांडलीय. काहींनी तर सत्तरी ओलांडलीय. पण या वयातही त्यांचा बोल्ड अवतार पाहायला मिळतो. पाहा तर बॉलिवूडच्या या बोल्ड मॉम...

तनुजा

अभिनेत्री काजोल आणि तनीषा मुखर्जीची मॉम तनुजा 76 वर्षांच्या आहेत. पण बोल्डनेसच्या बाबतीत लेकींपेक्षा कमी नाहीत. अलीकडे लेकीच्या वाढदिवशी तनुजा स्विमसूटमध्ये दिसल्या. त्यांचा स्विमसूटमधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

नीना गुप्ता

बोल्ड आणि बिनधास्त ही नीना गुप्तांची ओळख. नीना गुप्तांनी साठी कधीच ओलांडलीय. पण या वयातही बोल्ड कपड्यांतील स्वत:चे अनेक फोटो त्या शेअर करतात. मला बोल्ड कपड्यांतील फोटो शेअर करणे मनापासून आवडते. यावरच्या चाहत्यांच्या कमेंट्स मी एन्जॉय करते, असे नीना गुप्ता यांनी स्पष्ट केले होते.

मधु चोप्रा

प्रियंका चोप्राची मॉम मधु चोप्रा यांच्या बोल्डनेसच्या चर्चा सर्रास होताना दिसतात. 62 वर्षांच्या मधु चोप्रा अगदी हिरोईनसारखे आयुष्य जगातात. एकदा त्यांचा शॉर्र्ट्स घातलेला फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. अनेकदा प्रियंकासोबत त्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसल्या आहेत.

पूजा बेदी

पूजा बेदीला कोण ओळखत नाही. पूजाची मुलगी अलायाने नुकतेच ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पूजा बेदी 49 वर्षांची आहे आणि तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. गतवर्षी पूजाने मानेक कॉन्ट्रक्टरसोबत साखरपुडा केला.

डिंपल कपाडिया

अभिनेत्री टि्वंकल खन्नाची आई आणि अक्षय कुमारच्या सासूबाई डिंपल कपाडिया या वयातही कमालीच्या स्टाईलिश आहेत. बिनधास्त ही ओळख त्यांनी आजही जपलीय.

Web Title: madhu chopra to neena gupta bollywood heroines bold mother look at the photos-ram