मानवी गगरू दिसणार या नव्या वेबसीरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 16:46 IST2019-02-08T16:40:12+5:302019-02-08T16:46:58+5:30
'फोर मोअर शॉट्स प्लिज' या नव्या वेब सीरिजला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे अभिनेत्री मानवी गगरू सध्या यशाच्या शिखरावर आहे.

मानवी गगरू दिसणार या नव्या वेबसीरिजमध्ये
'फोर मोअर शॉट्स प्लिज' या नव्या वेब सीरिजला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे अभिनेत्री मानवी गगरू सध्या यशाच्या शिखरावर आहे. अमेझॉन प्राइमच्या या डिजिटल शोमधील मानवीची सिद्धी पटेल ही भूमिका घराघरांत चर्चेचा विषय बनली आहे. चार तरुण मुली, शहरी महिलांमधील गुंतागुंतीचे नाते, वर्क-लाइफ बॅलन्स, महत्त्वाकांक्षा आणि त्यातून येणारे दडपण अशा अनेक विषयांवर ही सीरिज आधारित आहे.
मानवीने साकारलेली एका गुजराती मुलीची भूमिका प्रेक्षकांना भावते आहे. विशेषतः तिच्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ती तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
या शोला इतके यश मिळत असताना आता प्रेक्षकांसाठी 'ट्रीपलिंग २'च्या माध्यमातून आणखीन एक मोठे सरप्राईज घेऊन येत आहे. अलीकडेच ट्रीपलिंग २चे पोस्टर लाँच करण्यात आले. सोशल मीडियावर त्याला तूफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टीव्हीएफच्या ट्रीपलिंगमधील चंचल असो वा पिचर्समधील श्रेया मानवीने आजवर सगळ्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. युट्युबच्या विविध वेब सीरिजमधून सगळ्यांची मने जिंकणारी ही अभिनेत्री 'तमाश्री डेट्स अ टोमॅटो', 'द स्पर्म गर्ल' अशा प्रेक्षकांकडून कौतुक मिळवणाऱ्या अनेक शॉर्ट फिल्मसचा भाग होती.