‘ऐ दिल..’ च्या शीर्षक गीताची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 10:26 IST2016-08-25T04:51:57+5:302016-08-25T10:26:38+5:30

 करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटाचा टीजर, ट्रेलर, पोस्टर्स, फर्स्ट लुक काहीही अद्याप आऊट करण्यात आलेले ...

The lyrics of 'Aye Dil ..' | ‘ऐ दिल..’ च्या शीर्षक गीताची झलक!

‘ऐ दिल..’ च्या शीर्षक गीताची झलक!

 
रण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल हैं मुश्किल’ या चित्रपटाचा टीजर, ट्रेलर, पोस्टर्स, फर्स्ट लुक काहीही अद्याप आऊट करण्यात आलेले नसल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाचे कथानक देखील टीमने गुलदस्त्यात ठेवल्याने चित्रपटाचा टीजर तरी केव्हा रिलीज होईल असे चाहत्यांना वाटते आहे.

टीजर ३० आॅगस्टला रिलीज होणार असून नुकत्याच चित्रपटाच्या शीर्षक गीताच्या काही ओळी आऊट झाल्या आहेत. क रण जोहरने टिवटरवर ९ मिलीयन फॉलोअर्स झाल्याने सेलिब्रेशन करत त्याने या लाईन्स शेअर केल्या आहेत.

त्याने शेअर केले,‘डीप ग्रॅटीट्यूड टू आॅल...तू सफर मेरा, तू ही हैं मेरी मंजील, तेरे बिना गुजारा, ऐ दिल हैं मुश्किल...’ अधुरा होके भी हैं ईश्क मेरा कामिल तेरे बिना गुजारा ऐ दिल हैं मुश्किल.’ प्रितमने हे गाणे टिवटरवर पोस्ट केले होते. चित्रपटात रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनुष्का शर्मा हे दिसणार आहेत. चित्रपट २८ आॅक्टोबरला रिलीज होणार आहे. 

Web Title: The lyrics of 'Aye Dil ..'