सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 10:47 IST2024-11-08T10:46:14+5:302024-11-08T10:47:14+5:30

एक महिन्याच्या आत गाणं लिहिणाऱ्याची अशी अवस्था करु की तो....

lyricist of song on salman khan and lawrence bishnoi got threat call at mumbai police control room | सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."

सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."

सलमान खान (Salman Khan) धमकी प्रकरणात रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. आता नुकतंच सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्याच्या नावाने धमकीवजा फोन आला आहे. मध्यरात्री १२ वाजता मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रुममध्ये हा धमकीचा फोन आला. वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातही लॉरेन्स बिश्नोई गँगचाच हात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई पोलिसांना आलेल्या धमकीत म्हटले आहे की, "एक महिन्याच्या आत गाणं लिहिणाऱ्याची अशी अवस्था करु की तो पुन्हा स्वत:च्या नावानेही गाणं लिहू शकणार नाही. सलमानमध्ये हिंमत असेल तर त्याने येऊन वाचवावं." असा इशारा देण्यात आला आहे. वरळी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्या नंबरवरुन धमकीवजा फोन आला तो ट्रेस केला जात आहे. तसंच हे कोणतं गाणं आहे आणि कोणी लिहिलं आहे हे त्याने सांगितलेलं नाही. याचाही तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान काल शाहरुख खानच्या नावानेही धमकी मिळाली होती. रायपूरमधून एका माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सलमानपाठोपाठ शाहरुख खानच्याही जीवालाही धोका आहे. दरम्यान सलमान खान सध्या हैदराबाद येथे 'सिकंदर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसंच पुढील महिन्यात तो दुबईला 'दबंग टूर'वर जाणार आहे. 

Web Title: lyricist of song on salman khan and lawrence bishnoi got threat call at mumbai police control room