देशात LPG चा तुटवडा; समीरा रेड्डीचा भन्नाट व्हिडीओ, सिलेंडरची 'VIP ट्रीटमेंट' पाहून हसू येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:09 IST2026-03-18T15:08:43+5:302026-03-18T15:09:02+5:30

समीरा रेड्डी हिने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

Lpg Shortage Sameera Reddy Viral Video Cylinder Vip Treatment | देशात LPG चा तुटवडा; समीरा रेड्डीचा भन्नाट व्हिडीओ, सिलेंडरची 'VIP ट्रीटमेंट' पाहून हसू येईल

देशात LPG चा तुटवडा; समीरा रेड्डीचा भन्नाट व्हिडीओ, सिलेंडरची 'VIP ट्रीटमेंट' पाहून हसू येईल

इराण आणि अमेरिकेमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्व आशिया भागात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. या तणावाचा परिणाम तेल आणि गॅस वाहतुकीवर जाणवत आहे. परिणामी भारतामध्ये अनेक ठिकाणी LPG गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. सिलेंडरसाठी अनेक ठिकाणी लोकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. या समस्येवर लोक विविध प्रकारे व्यक्त होत आहेत. कोणी केंद्र सरकारवर टीका करत आहे, तर कोणी मीम्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहे. या परिस्थितीवर लोकप्रिय अभिनेत्री समीरा रेड्डी मजेशीर पद्धतीने व्यक्त झाली आहे.

समीरा रेड्डी हिने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये गॅस सिलेंडरला अगदी VIP पाहुण्यासारखं ट्रीट केलं जात आहे. समीरा सिलिंडरला पैशाने हवा घालताना दिसते. त्यानंतर ती त्याच्यासोबत सेल्फी काढते, त्याला मुकुट घातला जातो आणि अगदी पाहुण्यासारखी त्याची आवभगत केली जाते. अभिनेत्री त्याला चहा आणि फुलं देत स्वागत करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांकडूनही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. 


गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ
दरम्यान, गॅस कंपन्यांनी एलपीजीचे दैनिक उत्पादन ९ हजार मेट्रिक टनांवरून ११ हजार मेट्रिक टनांपर्यंत वाढवले आहे. घरगुती सिलिंडरचे दर ८५२.५० रुपयांवरून ९१२.५० रुपये झाले आहेत, तर व्यावसायिक सिलिंडरचे दर १८३५ रुपयांवर पोहोचले आहेत. तर केंद्र सरकारने नागरिकांना एलपीजी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पुरवठ्याबाबत घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Web Title : LPG संकट: समीरा रेड्डी का मज़ेदार वीडियो, सिलेंडर को VIP ट्रीटमेंट!

Web Summary : वैश्विक तनाव के कारण एलपीजी की कमी के बीच, अभिनेत्री समीरा रेड्डी ने एक वायरल वीडियो में गैस सिलेंडर को वीआईपी ट्रीटमेंट देते हुए हास्यपूर्ण चित्रण किया है। नागरिकों को लंबी कतारों का सामना करना पड़ रहा है, जिससे विविध प्रतिक्रियाएं सामने आ रही हैं, जबकि उत्पादन बढ़ने के बावजूद गैस की कीमतें बढ़ रही हैं। सरकार एलपीजी के सावधानीपूर्वक उपयोग का आग्रह करती है।

Web Title : LPG shortage: Sameera Reddy's funny video on cylinder VIP treatment.

Web Summary : Amidst LPG shortages due to global tensions, actress Sameera Reddy humorously portrays VIP treatment to a gas cylinder in a viral video. Citizens face long queues, prompting diverse reactions, while gas prices rise despite increased production. The government urges mindful LPG use.