लो प्रोफाईल हिरो...नको रे बाबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2016 05:12 IST2016-02-21T12:10:42+5:302016-02-21T05:12:22+5:30

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला कैटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरच्या ‘फितूर’या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याचे ...

Low Profile Hero ... Do not ray baba! | लो प्रोफाईल हिरो...नको रे बाबा!

लो प्रोफाईल हिरो...नको रे बाबा!

ong>गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला कैटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरच्या ‘फितूर’या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. याचे कारण हाय प्रोफाईल हिरोईनच्या अपोझिट लो प्रोफाईल हिरो असल्याचे आता बोलले जात आहे. आपले प्रेक्षक एखाद्या मोठ्या नायिकेला नवोदित नायकासोबत जास्त पसंत का करीत नाही, यावर या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.



तीनही खान स्टार- सलमान, आमिर आणि शाहरुख खान सोबत सुपर हिट चित्रपट देणारी कैटरिनाबाबत ही चर्चा होती की, जर ‘फितूर’ ला यश मिळाले असते, तर बॉलिवूडच्या नंबर एकच्या सीटवर तिचा दावा पक्का झाला असता. मात्र आता असे वाटते की, ‘फितूर’मुळे  तिचा दावा कमजोेर बनला आहे. नवोदित नायक आणि मोठ्या स्टार नायिकांच्या जोडीवर ही एक नजर.

प्रियंका चोपडाचा ‘मेरी काम’, दीपिका पादुकोणचा ‘पीकू’, विद्या बालनचा ‘कहानी’ आणि कंगनाचा ‘तनु वेड्स मनु’ सीरिजच्या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे असे मानले गेले  की आता नायिका प्रधान चित्रपटांचा काळ परत आला आहे. परंतु असे सगळयाच नायिकांच्याबाबतीत घडले नाही.



प्रियंका चोपडासाठी आगामी चित्रपट ‘जय गंगाजल’देखील एॅसिड टेस्ट असेल. कारण या चित्रपटात तिच्यासोबत कोणताही मोठा नायक नाही. प्रियंकाने काही वर्षांपूर्वी ‘असंभव’ (नायक- अर्जुन रामपाल)च्या अपयशामुळे मोठ्याच नायकांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा काही वर्षांपूर्वी आपला जवळचा मित्र (त्या काळातील तिचा बॉयफे्रं ड) हरमन बैवेजा सोबत ‘लव स्टोरी २०५०’ हा चित्रपट तिने केला. ज्याला प्रेक्षकांनी नापसंत केले आणि याला प्रियंकाचे अपयश मानले गेले. 

अर्जुन रामपालनेदेखील अजून एक मोठ्या नायिकेला झटका दिला होता. ऐश्वर्या रॉयने ‘दिल का रिश्ता’ चित्रपटात अर्जुन रामपालला हीरो बनविले आणि हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप गेला. दीपिका पदुकोणने यशराजमध्ये नील नितिन मुकेश सोबत ‘परिंदे लफंगे’ आणि अभिषेक बच्चन सोबत ‘खेलेंगे जी जान से’मध्ये फ्लॉप चित्रपटांचा अनुभव घेतला आहे. सोनम कपूरच्या खात्यात ‘डोली की डाली’ सारखा अयशस्वी चित्रपट पडला, ज्यात कोणताच मोठा स्टार नव्हता.



अनुष्का शर्माने आपल्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘एनएच १०’ मध्ये कोणताच मोठा नायक घेतला नाही. परिणामी चित्रपटाला मोठे यश नाही मिळाले. लारा दत्ताने आपल्या दिग्दर्शनातील ‘चलो दिल्ली’मध्ये विनय पाठक सोबत जोडी बनविली आणि चित्रपट फ्लॉप झाला.

काही वर्षांपुर्वी माधुरी दीक्षितने ‘सैलाब’मध्ये आदित्य पंचोली सोबत, शिल्पा शेट्टी आणि रवीना टंडनचे मनोज वाजपेयी सोबत असा प्रयोग केला आणि हे सर्व प्रयोग फ्लॉप ठरले. 

Web Title: Low Profile Hero ... Do not ray baba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.