गंभीर मुद्यावर भाष्य करणारा ‘लव्ह सोनिया’चा ट्रेलर एकदा पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 14:52 IST2018-08-23T14:52:12+5:302018-08-23T14:52:39+5:30
जगभरात वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये धूम करणाऱ्या तरबेज नूरानी यांच्या ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला.

गंभीर मुद्यावर भाष्य करणारा ‘लव्ह सोनिया’चा ट्रेलर एकदा पाहाच!
जगभरात वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये धूम करणाऱ्या तरबेज नूरानी यांच्या ‘लव्ह सोनिया’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या चित्रपटाची जितकी काय प्रशंसा तुम्ही ऐकली असेल, तितकाच याचा ट्रेलरही आश्वासक आहे. चित्रपटाच्या थीमसोबतच यातील व्यक्तिरेखांचा अंदाज दाखवणारा हा ट्रेलर एकदा तरी पाहायला हवा.
मृणाल ठाकूर, मनोज वाजपेयी, राजकुमार राव, अनुपम खेर, रिचा चड्ढा, फ्रीडा पिंटो आणि आदिल हुसैन सारख्या हरहुन्नरी कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट देह विक्रय व्यवसायातील भीषण वास्तवाकडे लक्ष वेधतो. मृणाल ठाकूर या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतेय. तिने यात सोनिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. बहीणीचा शोध घेत घेत ती स्वत: देहविक्री व्यवसायाच्या दलदलीत फसते. ट्रेलर पाहता, अनुपम खेर आणि मनोज वाजपेयी यात एका सरप्राईज पॅकेजमध्ये दिसणार असल्याचे भासते. दोघांनीही निगेटीव्ह भूमिका साकारली आहे. दीर्घकाळापासून हे दोन्ही अभिनेते अशा भूमिकेत दिसलेले नाहीत. फ्रीडा पिंटो आणि रिचा सुद्धा दमदार भूमिकेत दिसत आहेत. मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. येत्या १४ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे, त्यापूर्वी एकदा तरी चित्रपटाचा ट्रेलर बघायलाच हवा.