"प्रेमाला वय कळत नाही अन् नाही मर्यादा...", ७० वर्षीय अभिनेत्यावर जडलं अभिनेत्रीचं प्रेम, होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:12 IST2024-12-18T12:11:11+5:302024-12-18T12:12:57+5:30
एका तरुण अभिनेत्रीने ७० वर्षीय प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रेम व्यक्त केले आहे. तिची ही पोस्ट पाहून तिला ट्रोल केले जात आहे.

"प्रेमाला वय कळत नाही अन् नाही मर्यादा...", ७० वर्षीय अभिनेत्यावर जडलं अभिनेत्रीचं प्रेम, होतेय ट्रोल
प्रेमाला वयाची मर्यादा नसते. प्रेम कधीही आणि कोणावरही करू शकता, असे म्हटले जाते. तसेच काहीसे एका अभिनेत्रीच्या बाबतीत घडल्याचे बोलले जात आहे. एका तरुण अभिनेत्रीने ७० वर्षीय प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव (Govind Namdev) यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून प्रेम व्यक्त केले आहे. तिची ही पोस्ट पाहून तिला ट्रोल केले जात आहे. ही अभिनेत्री म्हणजे शिवांगी वर्मा (Shivangi Verma).
गोविंद नामदेव यांच्यासोबतचा फोटो शेअर करून अभिनेत्री शिवांगी वर्माने लिहिले की, प्रेमाला वय कळत नाही अन् नाही मर्यादा.... या फोटोत ती गोविंद नामदेव यांच्या खांद्यावर हात ठेवून उभी आहे. ज्या पद्धतीने शिवांगीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ते समजल्यानंतर लोक ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे मानू लागले आहेत. लोक अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.
नेटकरी म्हणाले...
एका यूजरने लिहिले की, 'म्हणूनच पैसा महत्त्वाचा आहे.' दुसऱ्या युजरने विचारले, 'तुझा बॉयफ्रेंड आहे का?' शिवांगी वर्माच्या काही चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त करत 'तुम्ही लग्न करणार आहात का?' दुसऱ्या युजर त्यांच्या फोटोची खिल्ली उडवत म्हणाला, 'पैसा असेल तर वय नसते, मर्यादा नसते.' दोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या फोटोला ५० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
हा पब्लिसिटी स्टंट
काही लोक शिवांगी वर्माच्या फोटोला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहेत. वास्तविक, तिचा गोविंद नामदेव यांच्यासोबत एक चित्रपट येत आहे. कॉमेडी चित्रपटात दोघेही एकमेकांच्या अपोझिट दिसणार आहेत, ज्याबद्दल शिवांगी वर्मा खूप उत्सुक आहे. पुणे मिररच्या रिपोर्टनुसार, शिवांगी जोशी तिच्या व्यक्तिरेखेबद्दल म्हणाली, 'ही भूमिका माझ्या खऱ्या आयुष्यातील व्यक्तिमत्त्वापेक्षा खूपच वेगळी आहे.' ३१ वर्षीय शिवांगी वर्मा देखील या चित्रपटाबद्दल उत्साहित आहे कारण तिला गोविंद नामदेव आणि ब्रिजेंद्र काला यांसारख्या दिग्गजांसह स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे.
गोविंद नामदेव वर्कफ्रंट
गोविंदा नामदेव हे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'बँडिट क्वीन', 'सरफरोश', 'सत्या' यांसारख्या चित्रपटांमुळे प्रेक्षक त्यांची आठवण ठेवतात. प्रेम चोप्रा, अमरीश पुरी यांसारख्या दिग्गजांमध्ये आपली खास ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. ७० वर्षांचे गोविंदा नामदेव गेल्या ३ दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले. त्यांनी कधीही स्वतःला कोणत्याही पात्राशी बांधले नाही. 'शोला और शबनम' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.