'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:23 IST2025-11-25T11:22:39+5:302025-11-25T11:23:13+5:30
'लव्ह अँड वॉर' सिनेमा ही एक महाकाव्य प्रेमकथा असणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा आधारित आहे.

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरील फोटो लीक, रणबीरचा आर्मी लूक तर आलियाने रेट्रो स्टाईलमध्ये वेधलं लक्ष
संजय लीला भन्साळींच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. सिनेमात रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट अशी तगडी स्टारकास्ट आहे. काही महिन्यांपूर्वी आलिया भटचा सेटवरील फोटो समोर आला होता. यामध्ये ती रेट्रो लूकमध्ये दिसत होती. तर आता रणबीर आणि आलिया दोघांचे सेटवरील एकत्रित फोटो लीक झाले आहेत. या रिअल लाईफ जोडीची सिनेमात नक्की काय भूमिका असेल हे पाहण्यासाठी चाहते आणखी उत्सुक झाले आहेत.
'लव्ह अँड वॉर' सिनेमा ही एक महाकाव्य प्रेमकथा असणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा आधारित आहे. विकी, रणबीर आणि आलिया यांच्या प्रेमाचा त्रिकोण सिनेमात दिसणार आहे. प्रेम, युद्ध आणि संघर्षावर सिनेमाची कहाणी गुंफण्यात आली आहे. दरम्यान सेटवरील काही फोटो आता समोर आले आहेत. एका फोटोमध्ये भन्साळी हे रणबीर आणि आलियाला सीन समजावून सांगत आहेत. यामध्ये रणबीर आर्मी युनिफॉर्ममध्ये दिसतोय तर आलियाने अंगावर शाल पांघरली आहे. दोघांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्याच्या खुणा दिसत आहे. तर इतर फोटो बीटीएस सीन्सा आहेत. आलिया रेट्रो स्टाईल डिझायनर साडी आणि हेअर स्टाईलमध्ये दिसत आहे. तर रणबीर कधी शर्ट-पँट आणि टाय मध्ये दिसत आहे. तर कधी कॅज्युअल लूकमध्ये आहे. रणबीर कपूरच्या फॅन पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
लव्ह अँड वॉर सिनेमाचे हे बीटीएस पाहून चाहते उत्सुक झाले आहेत. सिनेमाच्या रिलीजची सर्वांनाच आतुरता आहे. सध्या रणबीर, विकी आणि आलिया दिवसरात्र सिनेमाचं शूट करत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचं रोज नाईट शूट सुरु होतं. तर दुसरीकडे रणबीरने 'रामायण' पहिल्या भागाचं शूट पूर्ण केलं आहे. दरम्यान 'लव्ह अँड वॉर'चं शूट आणखी सुरुच असल्याने आता 'रामायण'च्या दुसऱ्या भागाचं शूट पुढे ढकलावं लागण्याची शक्यता आहे.