रणबीर-आलिया आणि विकीचा 'लव्ह अँड वॉर' कधी प्रदर्शित होणार, समोर आलं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 13:03 IST2026-02-15T13:02:42+5:302026-02-15T13:03:30+5:30

बहुप्रतिक्षित चित्रपट 'लव्ह अँड वॉर'बाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.

Love And War Postponed Ranbir Kapoor Says Will Release After Ramayana Part One | रणबीर-आलिया आणि विकीचा 'लव्ह अँड वॉर' कधी प्रदर्शित होणार, समोर आलं अपडेट

रणबीर-आलिया आणि विकीचा 'लव्ह अँड वॉर' कधी प्रदर्शित होणार, समोर आलं अपडेट

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, आलिया भट, विकी कौशल यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट 'लव्ह अँड वॉर'बाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून, स्वतः रणबीर कपूरने एका इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रणबीर कपूरने त्याच्या क्लोदिंग ब्रँडच्या इन्स्टा लाईव्ह दरम्यान चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले की, 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट 'रामायण: भाग १' नंतर प्रदर्शित होईल. 'रामायण' हा चित्रपट २०२६ च्या ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर 'लव्ह अँड वॉर' डिसेंबर २०२६ मध्ये सिनेमागृहात धडकू शकतो.

'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, चित्रपटात मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्स आणि एरियल ॲक्शन सीक्वेन्सचे काम बाकी असल्याने हा चित्रपट थेट २०२७ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. तर 'हिंदुस्तान टाइम्स'च्या सूत्रांनुसार, चित्रपटाचे चित्रीकरण वेगाने सुरू असून संजय लीला भन्साळी यांनी एका गाण्याचे आणि काही महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे २०२६ च्या अखेरीस चित्रपट प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे.

रणबीरचे दोन मोठे प्रकल्प
सध्या रणबीर कपूर भारतीय सिनेसृष्टीतील दोन सर्वात मोठ्या चित्रपटांवर काम करत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटात रणबीर 'प्रभू श्रीराम' यांची भूमिका साकारत आहे. यात साई पल्लवी, सनी देओल आणि यश यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर दुसरा भन्साळींचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपट आहे. 
 

Web Title : रणबीर-आलिया और विक्की की 'लव एंड वॉर' की रिलीज डेट अपडेट आई सामने

Web Summary : संजय लीला भंसाली की 'लव एंड वॉर', जिसमें रणबीर, आलिया और विक्की हैं, में देरी। रणबीर ने 'रामायण: भाग 1' के बाद रिलीज की पुष्टि की, संभवतः दिसंबर 2026 में। वीएफएक्स काम के कारण 2027 तक देरी हो सकती है, कुछ फिल्मांकन पूरा होने के बावजूद। रणबीर 'रामायण' पर भी काम कर रहे हैं।

Web Title : Ranbir-Alia-Vicky's 'Love & War' Release Date Update Revealed

Web Summary : Sanjay Leela Bhansali's 'Love & War,' starring Ranbir, Alia, and Vicky, faces delay. Ranbir confirmed its release post-'Ramayana: Part 1,' likely in December 2026. VFX work might push it to 2027, despite some filming completion. Ranbir is also working on 'Ramayana'.