कोरोना काळात 'लव्ह आज कल'ची अभिनेत्री झाली होती बेरोजगार; कामासाठी फिरत होती दारोदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 05:45 PM2024-01-01T17:45:00+5:302024-01-01T17:45:00+5:30

Bollywood actress: या अभिनेत्रीने तमाशा, लव्ह आज कल यांसारख्या गाजलेल्या सिनेमात काम केलं आहे.

love-aaj-kal-tamasha-fame-arushi-sharma-quit-acting-and-looking-for-jobs-know-the-reason | कोरोना काळात 'लव्ह आज कल'ची अभिनेत्री झाली होती बेरोजगार; कामासाठी फिरत होती दारोदार

कोरोना काळात 'लव्ह आज कल'ची अभिनेत्री झाली होती बेरोजगार; कामासाठी फिरत होती दारोदार

२०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला होता. परिणामी, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. परंतु, या लॉकडाऊनचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला.इतंकच नाही तर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या लॉकडाऊनची झळ बसली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींना काम मिळेनासं झालं. परिणामी, अनेक जण बेरोजगार झाले. याच कोरोनामुळे बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीला इंडस्ट्री सोडावी लागली. इतकंच नाही तर आज ती चक्क नोकरीच्या शोधात दारोदार फिरत आहे. 

लव्ह आज कल, तमाशा यांसारख्या सिनेमात झळकलेली अभिनेत्री आरुषी शर्मा हिने नाईलाजास्तोवर बॉलिवूडमधून काढता पाय घेतला आहे. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्यावर ओढावलेल्या संकटाविषयी भाष्य केलं आहे. 

२०१५ मध्ये आरुषीने   इम्तियाज अली यांच्या तमाशा या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती २०१९ मध्ये लव्ह आज कल या सिनेमात झळकली. या सिनेमात तिने रणदीप हुड्डा याच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. परंतु, २०२० मध्ये लॉकडाऊन लागला आणि तिला काम मिळणं बंद झालं. हातात काम नसल्यामुळे तिला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिने अभिनय सोडून नोकरी करायच ठरवलं.

दरम्यान, आरुषी इंजिनिअरिंग कंपन्यांमध्ये काम शोधत असतानाच तिला २०२२ नेटफ्लिक्सचा सिनेमा मिळाला. जादूगर या सिनेमात तिने जितेंद्र कुमारसोबत मुख्य भूमिका साकारली. 

Web Title: love-aaj-kal-tamasha-fame-arushi-sharma-quit-acting-and-looking-for-jobs-know-the-reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.