‘रंगस्थलम’च्या टीजरमध्ये दिसला साउथच्या ‘या’ सुपरस्टारचा बिनधास्त अंदाज, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:00 IST2018-01-25T11:30:24+5:302018-01-25T17:00:24+5:30
साउथचा सुपरस्टार राम चरण लवकरच त्याच्या आगामी ‘रंगस्थलम’ चित्रपटात एका बिनधास्त अंदाजात बघावयास मिळणार आहे.

‘रंगस्थलम’च्या टीजरमध्ये दिसला साउथच्या ‘या’ सुपरस्टारचा बिनधास्त अंदाज, पाहा व्हिडीओ!
स उथ सुपरस्टार राम चरण याच्या आगामी ‘रंगस्थलम’चा टीजर प्रदर्शित झाला असून, त्यास यु-ट्यूबवर तुफान प्रतिसाद मिळत आहे. टीजरमध्ये राम चरणचा दाढीमधील बिनधास अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड भावत असताना दिसत आहे. टीजरची सुरुवातच राम चरणच्या एंट्रीने होते. तो चित्रपटात चिट्टीबाबूच्या भूमिकेत दिसणार आहे. चिट्टीबाबू पेशाने इंजिनिअर असतो. विशेष म्हणजे लोक आवाज ऐकतात, परंतु चिट्टीबाबू आवाज बघू शकतो असे टीजरमध्ये दाखविण्यात आल्याने राम चरणचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना खूपच भावत आहे. त्यामुळेच केवळ २४ तासातच हा टीजर ५० लाखांपेक्षा अधिक लोकांनी यु-ट्यूबवर बघितला आहे.
दरम्यान, या चित्रपटात राम चरणबरोबर सामंथा रूथ प्रभू प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटात आधी पिनिसेत्ती आणि जगपती बाबूही प्रमुख भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहेत. तर ‘रंगस्थलम’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटालात राम चरणचे वडील चिंरजिवीने लॉन्च केले आहे. चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना आतापासूनच त्याची उत्सुकता लागली आहे.
राम चरणचा ‘रंगस्थलम’ ३० मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षी राम चरणचा धु्रव रिलीज झाला होता. त्याचा हा चित्रपट एका तामीळ चित्रपटाचा रिमेक होता. सुकुमार यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहता हिट चित्रपट देण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ज्युनियर एनटीआरसोबतचा त्यांचा ‘ननाकू प्रेमातो’ हा चित्रपट सुपरहिट राहिला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडूनही त्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.