पाहा सोनाक्षीची हमशक्ल साहेबा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 16:49 IST2016-12-22T16:49:36+5:302016-12-22T16:49:36+5:30
बॉलिवूडमध्ये सलमान, शाहरुख, हृतिक आणि आमिरसह अनेक सुपरस्टार्सचे डुप्लिकेट किंवा लूक अ लाइक आहेत, ज्यांना पहिल्या नजरेत बघून तुम्ही ...

पाहा सोनाक्षीची हमशक्ल साहेबा...
ब लिवूडमध्ये सलमान, शाहरुख, हृतिक आणि आमिरसह अनेक सुपरस्टार्सचे डुप्लिकेट किंवा लूक अ लाइक आहेत, ज्यांना पहिल्या नजरेत बघून तुम्ही अचंबित होऊ शकता. मात्र बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींच्या बाबतीत सहसा असे घडताना दिसत नाही. अभिनेत्रींसारख्या हुबेहुब दिसणा-या व्यक्तींची अतिशय क्वचित उदाहरणे समोर येतात. आता वरील छायाचित्रात तुम्ही बॉलिवूड अॅक्ट्रेस सोनाक्षी सिन्हा आणि तिची हमशक्ल साहेबा कोहलीला बघू शकता. साहेबा ही हुबेहुब सोनाक्षीची कॉपी आहे. साहेबाने सोशल मीडियावर तिचे अनेक फोटोज शेअर केले आहेत.
साहेबाची पर्सनॅलिटीसुद्धा हुबेहुब सोनाक्षीसारखी... साहेबा कोहलीचा फक्त चेहराच नव्हे तर तिची उंची आणि पर्सनॅलिटीसुद्धा सोनाक्षीशी साधर्म्य साधणारी आहे. साहेबा दुबई (यूएई) वास्तव्याला आहे. सोशल मीडियावर दिवाळीच्या काळात साहेबाने एक फोटो शेअर करुन लिहिले होते, हॅपी दिवाली लव अॅन्ड लाईट...नकली सोना... रंजक बाब म्हणजे, सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम हँडलचे नाव असली सोना आहे, तर साहेबाने तिच्या फोटोसोबत नकली सोना लिहिले होते. साहेबाला सोनाक्षीची कार्बन कॉपी म्हटले तर वावगे ठरणार नाही. तसे पाहायला गेले तर आता सोनाक्षईला एक स्पर्धक आली असे म्हणायलाही काही वावगे ठरणार नाही. कदाचित साहेबासाठी लवकरच बॉलिवूडचे दरवाजे खुले होऊ शकतात. कारण याआधी ऐश्वर्या, कॅटरीना यांच्या हमशक्ल मुलींना सलमाननेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवून दिली होती. त्यामुळे साहेबा देखील आपल्याला सल्लुमियाँच्या आगामी एखादया चित्रपटात दिसली तर आश्चर्य वाटायला नको.