पाहा... आलिया भट्टला कसा पाहिजे जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 16:38 IST2017-02-19T11:08:01+5:302017-02-19T16:38:01+5:30

प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराचे स्वप्न रंगवत असतो. आपल्याला एक असा जोडीदार मिळावा अशी चौकट त्याने मनात केलेली असते. मग ...

Look ... how to get married to Alia Bhatt | पाहा... आलिया भट्टला कसा पाहिजे जोडीदार

पाहा... आलिया भट्टला कसा पाहिजे जोडीदार

रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराचे स्वप्न रंगवत असतो. आपल्याला एक असा जोडीदार मिळावा अशी चौकट त्याने मनात केलेली असते. मग यामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकार तरी कसे मागे राहतील. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आलिया भट्ट हिनेदेखील आपल्या जोडीदाराविषयीची स्वप्ने रंगविली आहे. तो कसा पाहिजे याचा खुलासा तिने नुकतेच एका मुलाखतीत केला आहे.
           
        आलिया सांगते, माझा आयुष्याचा सोबती चांगला मित्र असावा, आमच्या दोघांचे विचार एकमेकांसोबत मिळायला हवेत, असे आलियाने म्हटले आहे.  आलिया तिच्या भावी पतीविषयीच्या अपेक्षा सांगताना कामाला प्राधान्य देताना देखील दिसून आली. मी माज्या कामावर खूप प्रेम करते. त्यामुळे लग्न तसेच मुलांच्या जन्मानंतर चित्रपट करणे सोडून देईल असे वाटत नाही. त्यामुळे आयुष्याची साथ देणाºया माज्या भावी पतीने  माज्यासोबत माज्या कामालाही महत्त्व द्यावे, अशी इच्छा तिने बोलून दाखविली. लग्नासंबंधी बोलताना आलियाने प्रेम विवाहाला पसंती दिली. जोडीदाराला लग्नापूर्वी समजून घ्यायचे असेल तर ठरवून लग्न केल्यास हे साध्य होणार नाही. कारण तुमचे आणि तुमच्या भावी जोडीदाराचे विचार आई-वडिलांना समजणे अशक्य असेच आहे. 
   
         सध्या ती बद्रीनाथ की दुल्हनिया या तिच्या आगामी चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता वरूण धवन झळकणार आहे. त्याची ही जोडी पूर्वी स्टुडंट आॅफ द इयर या चित्रपटात पाहायला मिळाली होती. त्यांची ही जोडी प्रेक्षकांच्या ही पसंतीस उतरताना दिसत आहे. चला तर मग पाहूयात प्रेक्षकांना या जोडीचा  बद्रीनाथ की दुल्हनिया हा चित्रपट पसंतीस उतरतो का

Web Title: Look ... how to get married to Alia Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.