‘फादर्स डे’ला बघाच : दी हिरो: बॉलिवूड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 18:07 IST2016-06-18T12:37:17+5:302016-06-18T18:07:17+5:30

उद्या फादर्स डे..त्या आधी गुगलसोबत बॉलिवूड अ‍ॅक्टर विकी कौशल याने एक शॉर्ट अ‍ॅड फिल्म आणली आहे. एक मुलगा आपल्या वडिलांचे अ‍ॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतो, अशी ही कथा आहे.

Look at Father's Day: The Hero: Bollywood Story | ‘फादर्स डे’ला बघाच : दी हिरो: बॉलिवूड स्टोरी

‘फादर्स डे’ला बघाच : दी हिरो: बॉलिवूड स्टोरी

पूर्ण जगभरात उद्या (19 जून) फादर्स डे साजरा होत आहे. रोजच्या धावपळीत आपल्याला आई-वडिलांचा  विसर पडतो.अनेकदा आपण त्यांना गृहित धरतो. आई-वडिल आपल्यासाठी झिजतात आणि आपण ते त्यांचे कर्तव्यच म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. आई-वडिलांचे ऋण फेडणे तर शक्य नाही. पण किमान ‘मदर्स डे’आणि ‘फादर्स डे’ अशा काही दिवशी प्रत्येकाने आई-वडिलांची पुण्याई एकदा तरी आठवावी! उद्या फादर्स डे..त्या आधी गुगलसोबत बॉलिवूड अ‍ॅक्टर विकी कौशल याने एक शॉर्ट अ‍ॅड फिल्म आणली आहे. एक मुलगा आपल्या वडिलांचे अ‍ॅक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतो, अशी ही कथा आहे. वडिलांना अ‍ॅक्टर व्हायचे असते. पण ते त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.मग मुलगा या पित्याचे स्वप्न पूर्ण करते, ते कसे?? ते तुम्हीच बघा!!
 

Web Title: Look at Father's Day: The Hero: Bollywood Story