​पाहा :‘ढिशूम’ चा ट्रेलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 18:02 IST2016-06-01T12:32:24+5:302016-06-01T18:02:24+5:30

‘ढिशूम’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज बुधवारी अखेर आऊट झाला.

Look: 'Dashoom' trailer | ​पाहा :‘ढिशूम’ चा ट्रेलर

​पाहा :‘ढिशूम’ चा ट्रेलर

िशूम’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर आज बुधवारी अखेर आऊट झाला. जॉन अब्राहम आणि वरूण धवन शिवाय हॉट ब्युटी जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ढिशूम’ चा ट्रेलर सुरु होतो ते एका क्रिकेटपटूच्या अपहरणाने. वरूण आणि जॉन यात पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहेत. अपहरण झालेल्या क्रिकेटपटूच्या शोधासाठी हे दोघेही पोलिस अधिकारी जीवाचे रान करतात आणि केवळ ३६ तासांमध्ये क्रिकेटरला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवतात. भारत-पाक क्रिकेट मॅचच्या फायनलपूर्वी हा क्रिकेटपटू मैदानावर हजर होतो, अशी ही कथा आहे. जॉन अब्राहम चित्रपटात अँग्री मॅनच्या भूमिकेत आहे तर वरूण तितकाच कूल,फनी आहे. यातले काही डॅशिंग अ‍ॅक्शन सीन्स शिवाय मोस्ट ब्युटिफुल श्रीलंकन ब्युटी जॅकलीन हे सगळे एन्जॉय करायचे असेल तर हा ट्रेलर पाहायलाच हवा..

Web Title: Look: 'Dashoom' trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.