​पाहाच...‘हम्मा हम्मा’ गाण्याचा ‘क्लासिक लूक ’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 13:18 IST2017-02-03T07:48:57+5:302017-02-03T13:18:57+5:30

सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ए. आर. रहमान यांच्या ‘हम्मा हम्मा’ या गाण्यावर जबरदस्त फ्यूजन करण्यात आले आहे. हे फ्यूजन लोकांना चांगलेच भावले असून आत्तापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Look at the 'classic look' of 'Hmmma Hmmma' !! | ​पाहाच...‘हम्मा हम्मा’ गाण्याचा ‘क्लासिक लूक ’!!

​पाहाच...‘हम्मा हम्मा’ गाण्याचा ‘क्लासिक लूक ’!!

शल मीडियावर एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ए. आर. रहमान यांच्या ‘हम्मा हम्मा’ या गाण्यावर जबरदस्त फ्यूजन करण्यात आले आहे. हे फ्यूजन लोकांना चांगलेच भावले असून आत्तापर्यंत १२ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. शेवटी यात एका पॉप गाण्याला क्लासिक लूक देण्यात आला आहे आणि नेमकी हीच बाब लोकांना आवडलीय.
प्रिया कुमार वरूणेश आणि डान्सर सात्विक महाजन या दोघांनी हा क्लासिक लूक कोरिओग्राफ केला आहे. यात भरतनाट्यम  आहे, बॉलिवूड स्टाईल आहे शिवाय कन्टेम्पररी आहे. आता या तिघांचा मिलाफ लोकांना पाहायला आवडणारच.  

ALSO READ : ​‘हम्मा हम्मा...’तील आदित्य-श्रद्धाची हॉट केमिस्ट्री तुम्ही पाहिलीत का?
या’ गायकाने म्हटले ‘हम्मा हम्मा’ गाण्याला फालतू

अलीकडे शाद अली दिग्दर्शित ‘ओके जानू’ या चित्रपटात ‘हम्मा हम्मा’ या गाण्याचे नवे व्हर्जन ऐकायला मिळाले होते. श्रद्धा कपूर आणि आदित्य राय कपूर या दोघांवर हे नवे व्हर्जन चित्री१ करण्यात आले होते. ९० च्या दशकात ‘बॉम्बे’ चित्रपटातील ‘हम्मा हम्मा’ गाणे प्रचंड लोकप्रीय झाले होते. आॅस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमान याला या गाण्याने एक नवी ओळख मिळवून दिली होती.‘ओके जानू’मध्ये हे गाणे वेगळ्या रूपात दिसले. .‘ओके जानू’मध्ये जुबीन नौटियाल आणि साशा तिरूपती यांनी हे गाणे गायले असून तनिष्क बागची, रॅपर बादशाह आणि ए. आर. रहमान यांनी याला वेगवेगळ्या रूपात कम्पोज केले आहे.
‘बॉम्बे’मधील ओरिजनल ‘हम्मा हम्मा’ हे गाणे अरविंद स्वामी, मनीषा कोईराला आणि सोनाली बेन्द्रे यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. यानंतर आदित्य आणि श्रद्धा यांनी गाण्याला एक नवी ओळख दिली. आता याचे आणखी एक क्लासिक लूक तुमच्यासमोर आहे. तेव्हा बघाच...!


 

Web Title: Look at the 'classic look' of 'Hmmma Hmmma' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.