पाहा :‘रूस्तम’साठी आलियाने केला रेन डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 17:09 IST2016-08-11T11:33:06+5:302016-08-11T17:09:37+5:30
केवळ ‘रूस्तम’ची स्टारकास्टच नाही तर बॉलिवूडमधील वेगवेगळे स्टार्स अक्षयचा हा चित्रपट प्रमोट करताना दिसत आहेत. आता या यादीत आलिया भट्ट हिचेही नाव जुळले आहे.

पाहा :‘रूस्तम’साठी आलियाने केला रेन डान्स
अ ्षय कुमारचा ‘रूस्तम’ उद्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एकीकडे अक्षयचे चाहते ‘रूस्तम’ पाहण्यासाठी आतूर झाले असताना दुसरीकडे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. केवळ ‘रूस्तम’ची स्टारकास्टच नाही तर बॉलिवूडमधील वेगवेगळे स्टार्स अक्षयचा हा चित्रपट प्रमोट करताना दिसत आहेत. आता या यादीत आलिया भट्ट हिचेही नाव जुळले आहे. आलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. पिवळ्या रंगाची साडी आणि डोक्यावर नौदलाची कॅप अशा ‘हॉट’ अवतारात ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यावर डान्स करताना आलिया यात दिसते आहे. ‘रूस्तम’ पाहण्याचे आवाहन तिने या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे. आलियाच नव्हे तर तिच्याआधी सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, रणवीर सिंह, सोनम कपूर, करण जौहर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन, फवाद खान आदी ‘रूस्तम’ प्रमोट करताना दिसले. सुपरस्टार रजनीकांत यांनीही ‘रूस्तम’साठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता इतके शुभचिंतक आणि शुभेच्छा सोबत असताना ‘रूस्तम’ नक्की यशस्वी ठरणार, असेच म्हणायला हवे.
{{{{twitter_video_id####
{{{{twitter_video_id####
}}}}