पाहा : ‘४४० वोल्ट...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 17:46 IST2016-06-14T12:05:51+5:302016-06-14T17:46:21+5:30
‘सुल्तान’चे तिसरे गाणे ‘४४० वोल्ट...’ रिलीज झाले आहे. मस्तीने भरलेले हे गाणे म्हणजे धम्माल आहे.
.jpg)
पाहा : ‘४४० वोल्ट...’
स मान खान व अनुष्का शर्मा यांचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘सुल्तान’ रिलीज व्हायला आता महिनाभराचा अवकाश आहे. चित्रपटाचा ट्रेलर , डायलॉग प्रमो आणि गाणे पाहून लोकांची ‘सुल्तान’बद्दलची उत्कंठा चांगलीच वाढलीय. चित्रपटाचे पहिले गाणे ‘बेबी को बास पसंद है...’ लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले. त्यानंतर ‘जग घूमेया’ हे गाणेही लोकांना खूप आवडले. आता चित्रपटाचे तिसरे गाणे ‘४४० वोल्ट...’ हेही रिलीज झाले आहे. मस्तीने भरलेले हे गाणे म्हणजे धम्माल आहे. अनुष्का व सलमान यांचा मॉर्डन लूक यात पाहायला मिळत आहे. सलमान नेहमीप्रमाणे हँडसम दिसत असून अनुष्काही ग्लॅमरस आणि हॉट दिसतेय. सलमानच्या डान्समध्ये फारसे काही नवेपण नाही. पण गाणे निश्चितच कलरफुल्ल आहे, तेव्हा बघा तर...