फिटनेस फ्रिक मलायका अरोरा ‘लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:27 IST2023-09-12T23:27:18+5:302023-09-12T23:27:36+5:30

Lokmat Most Stylish Award 2023 : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा 'लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा' या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

lokmat msa 2023 bollywood actress Malaika Arora awarded with Most Stylish Fashionista | फिटनेस फ्रिक मलायका अरोरा ‘लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा’

फिटनेस फ्रिक मलायका अरोरा ‘लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा’

मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्याच्या माध्यमातून केला जातो. यंदाही लोकमत मोस्ट स्टायलिस्ट अवॉर्ड सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.

या अवॉर्ड सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा लोकमत मोस्ट स्टायलिश फॅशनिस्टा या पुरस्काराने गौरविण्यात आलं. मलायकाने तिच्या क्लासी लूकने लोकमतच्या अवॉर्ड सोहळ्याला चार चांद लावले. ऐन पन्नाशीतही मलायकाचं सौंदर्य तरुणींना लाजवेल असं बहरलं होतं.

मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या मलायकाने अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. मुन्नी बदनाम हुई, जलेबी बाई हे मलायकाचे आयटम साँग हिट झाले आहेत. मलायका तिच्या बोल्डनेसबरोबरच फिटनेससाठी ओळखली जाते. मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. अनेकदा ती सोशल मीडियावरही व्यायाम करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते.

Web Title: lokmat msa 2023 bollywood actress Malaika Arora awarded with Most Stylish Fashionista