"मी आपली खूप आभारी आहे", अनन्या पांडेचं मराठी ऐकलं का? ड्रीम गर्ल ठरली 'Most Stylish Glam Icon'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 00:58 IST2023-09-13T00:57:57+5:302023-09-13T00:58:26+5:30
Lokmat Most Stylish Glam Icon 2023 : अनन्याचा ‘मोस्ट स्टायलिश ग्लॅम आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

"मी आपली खूप आभारी आहे", अनन्या पांडेचं मराठी ऐकलं का? ड्रीम गर्ल ठरली 'Most Stylish Glam Icon'
दरवर्षी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा मुंबईतील सेंट रेजिस येथे मंगळवारी(१२ सप्टेंबर) पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आलं. अनन्याचा ‘मोस्ट स्टायलिश ग्लॅम आयकॉन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर अनन्याने मराठीत आभार मानले. “थँक्यू लोकमत...मी आपली खूप आभारी आहे”, असं अनन्या मराठीत म्हणाली. त्यानंतर ती म्हणाली, “मी हा अवॉर्ड माझ्या ड्रीम टीमला डेडिकेट करू इच्छिते. त्यांच्यामुळे मला रोज ड्रीम गर्लसारखं फील होतं.”
लोकमत अवॉर्डसाठी अनन्याने खास लूक केला होता. तिच्या ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान, नुकताच अनन्याचा ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने आयुष्मान खुरानाबरोबर मुख्य भूमिका साकारली आहे. अनन्या ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आहे. तिने ‘पती पत्नी और वो’, ‘खाली पिली’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटांत काम केलं आहे.