टायगर श्रॉफ ठरला अॅक्शनचा बादशहा! 'मोस्ट स्टायलिश अॅक्शन स्टार'ने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 09:49 IST2023-09-12T23:39:07+5:302023-09-13T09:49:33+5:30
Lokmat Most Stylish Award 2023 : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अॅक्शन स्टार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.

टायगर श्रॉफ ठरला अॅक्शनचा बादशहा! 'मोस्ट स्टायलिश अॅक्शन स्टार'ने गौरव
दरवर्षी लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड सोहळ्यात मनोरंजन, उद्योग, राजकारणातील स्टायलिश व्यक्तीमत्त्वांचा सन्मान केला जातो. यंदा हा सोहळा मुंबईतील सेंट रेजिस येथे मंगळवारी(१२ सप्टेंबर) पार पडला. कलाविश्वातील अनेक सितारे लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्डच्या रेड कार्पेटवर अवतरलेले दिसले. मराठीसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी लोकमच्या अवॉर्ड सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. मुंबईतील सेंट रेजिस येथे हा अवॉर्ड सोहळा पार पडला.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफला या पुरस्कार सोहळ्यात ‘ लोकमत मोस्ट स्टायलिश अॅक्शन स्टार’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. अनेक सुपरस्टार्सला मागे टाकत टायगर श्रॉफ यंदाचा अॅक्शनचा बादशहा ठरला.
टायगर श्रॉफने २०१२ साली हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्याचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी २’, ‘स्टुडंट ऑफ द इयर २’, ‘वॉर’, ‘बागी ३’, ‘हिरोपंती २’ या चित्रपटांत त्याने मुख्य भूमिका साकारली आहे. टायगर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.