इसके स्टाइल का जवाब नहीं! सुनील शेट्टी ठरला Lokmat Most stylish Timeless Icon
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 23:17 IST2023-09-12T23:16:44+5:302023-09-12T23:17:35+5:30
Suniel Shetty: सुनील शेट्टीने वयाची ६० वर्ष पार केली आहेत. मात्र, त्याचा उत्साह आणि फिटनेस वाखाणण्याजोगा आहे.

इसके स्टाइल का जवाब नहीं! सुनील शेट्टी ठरला Lokmat Most stylish Timeless Icon
90 च्या दशकातील हिट कलाकारांच्या यादीत आवर्जुन नाव घेतलं जाणारा अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी (Suniel Shetty). उत्तम अभिनय आणि फिटनेस यांच्या जोरावर सुनील शेट्टीने प्रेक्षकांना अल्पावधीत आपलंसं केलं. इतकंच नाही तक आजही त्याच्या फिटनेसची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. पिळदार शरीरयष्टी आणि फिटनेस यामुळे आज तो एव्हरग्रीन अभिनेता म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे फिटनेस आणि हटके स्टाइल यांच्यामुळे चर्चेत येणाऱ्या सुनील शेट्टीला नुकतंच लोकमत मोस्ट स्टायलिश टाइमलेस आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
सध्या मुंबईमध्ये लोकमत मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात कलाविश्वातील अनेक कलाकारांना सन्मानित करण्यात येत आहे. यामध्येच सुनील शेट्टीला Most stylish Timeless Icon या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
दरम्यान, सुनील शेट्टीने वयाची ६० वर्ष पार केली आहेत. मात्र, त्याचा उत्साह आणि फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक व्यावसायिकदेखील आहे. सुनील पॉपकॉर्न एंटरटेनमेंट प्रायव्हेट या प्रोडक्शन हाऊसचा मालक आहे तसंच तो मुंबईत दोन रेस्टॉरंटही चालवतो.