प्रकाश राजचा घूमजाव; म्हटले ‘पाच-पाच पुरस्कार परत करायला मी काही मुर्ख नाही’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 14:32 IST2017-10-03T09:01:36+5:302017-10-03T14:32:37+5:30

वरिष्ठ कन्नड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र निषेध करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा ...

Light of the light; I'm not a fool to give five-five rewards! | प्रकाश राजचा घूमजाव; म्हटले ‘पाच-पाच पुरस्कार परत करायला मी काही मुर्ख नाही’!!

प्रकाश राजचा घूमजाव; म्हटले ‘पाच-पाच पुरस्कार परत करायला मी काही मुर्ख नाही’!!

िष्ठ कन्नड पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा तीव्र निषेध करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निशाणा साधणारा दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज याने काही तासांतच आपल्या वक्तव्यावरून घूमजाव केला आहे. प्रकाश राजने गेल्या सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताशेरे ओढताना म्हटले होते की, ‘जेव्हा तुम्ही आदित्यनाथ यांचे वक्तव्य ऐकता, तेव्हा प्रश्न पडतो की, ते मुख्यमंत्री आहेत की पुजारी?’ त्याने त्यांच्यावर ताशेरे ओढताना म्हटले होते की, ‘आदित्यनाथ माझ्यापेक्षा उत्कृष्ट अभिनेता आहेत. मी आता विचार करीत आहे की, माझे सर्व राष्टÑीय पुरस्कार त्यांना देऊन टाकावेत.’

मात्र काही तासांनंतरच प्रकाश राज यांनी ‘राष्टÑीय पुरस्कार परत करण्यावरून घूमजाव केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘पाच-पाच राष्टÑीय पुरस्कार परत करण्यास मी काही मुर्ख नाही. हे राष्टÑीय पुरस्कार मला माझ्या कामामुळे मिळाले आहेत. यावर मला अभिमान वाटतो. दरम्यान, याअगोदर प्रकाश राज यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ म्हटले होते की, ‘हे खूपच दु:खदायक आहे की, प्रधानमंत्री सोशल मीडियावर त्या लोकांना फॉलो करीत आहे जे गौरी लंकेश यांच्या हत्येचा आनंद साजरा करीत आहेत. 



बंगळुरू येथे डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्या (डीवायएफआय) अकराव्या राज्यस्तरीय बैठकीत प्रकाश राज यांनी म्हटले होते की, ‘गौरी यांच्या मारेकºयांना आतापर्यंत पकडण्यात आले नाही. यापेक्षाही दु:खदायक बाब ही आहे की, सोशल मीडियावर त्यांच्या हत्येचा आनंद साजरा करणाºया लोकांना प्रधानमंत्री फॉलो करीत आहेत. यावेळी प्रकाश राजने असेही म्हटले की, ‘काही लोक गौरी यांच्या हत्येचा अजूनही आनंद साजरा करीत आहेत. प्रधानमंत्रीही त्यांना फॉलो करीत आहेत. आपल्या देशाचा असा प्रधानमंत्री आहे जो या घटनेकडे डोळे बंद करून बघत आहे. 

Web Title: Light of the light; I'm not a fool to give five-five rewards!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.