क्रिती, बीओबी दरम्यान कायदेशीर लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 18:29 IST2016-06-30T12:54:49+5:302016-06-30T18:29:28+5:30

शिरीष कुंदरचा क्रिती आणि अनिल निपानेचा बीओबी यांच्यादरम्यान पोस्टरवरुन वाद सुरू आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही झडत आहेत.  नेपाळी ...

Legal battle between the crew, BOB | क्रिती, बीओबी दरम्यान कायदेशीर लढाई

क्रिती, बीओबी दरम्यान कायदेशीर लढाई

रीष कुंदरचा क्रिती आणि अनिल निपानेचा बीओबी यांच्यादरम्यान पोस्टरवरुन वाद सुरू आहे. एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही झडत आहेत. 
नेपाळी चित्रपट निर्माता अनिल निपाने यांनी  शिरीष कुंदरने आपली कथा चोरली असून, क्रितीच्या निर्मात्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे फेसबुकवर सांगितले.
या दोन चित्रपटामधील बीओबी हा तुलनेने छोटासा तर क्रिती हा राधिका आपटे, मनोज वाजपेयी, नेहा शर्मा यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा चित्रपट आहे. दोन्ही चित्रपट मनोविकारतज्ज्ञाशी संलग्नित आहेत.
टीम क्रितीने आरोप केला की,  निपाने कायदेशीर नोटीशीला उत्तर देण्यास अपयशी ठरले आहेत. ‘आम्ही बीओबीच्या दिग्दर्शकांना योग्य पुराव्यासह आरोप करण्यासंदर्भात कळविले होते. ते दाखविण्यास असमर्थ ठरले, त्याचबरोबर कायदेशीर संवादही करु शकलेले नाहीत.
शिरीष कुंदर यांच्या अनुसार बीओबी हाच चित्रपट दुसºयावरुन घेतलेला आहे. काही दिवसात अनिल निपाने यांनी माफी मागावी म्हणून कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आली आहे.
क्रिती २२ जूनला यु ट्यूबवर रिलीज झाला. २.५ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. 

Web Title: Legal battle between the crew, BOB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.