जाणून घ्या ‘बेफिक्रे’ने प्रदर्शनाआधीच कोणता रचला विक्रम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2016 10:32 IST2016-11-13T18:04:33+5:302016-11-14T10:32:07+5:30
यंदाचा सगळ्यांत बोल्ड सिनेमा कोणता? तर ‘बेफिक्रे’. होय,या वर्षीचा बॉलिवूडमधला सर्वात बोल्ड सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिले जात आहे. ...

जाणून घ्या ‘बेफिक्रे’ने प्रदर्शनाआधीच कोणता रचला विक्रम?
य दाचा सगळ्यांत बोल्ड सिनेमा कोणता? तर ‘बेफिक्रे’. होय,या वर्षीचा बॉलिवूडमधला सर्वात बोल्ड सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिले जात आहे. अलीकडे या चित्रपटाचा ट्रेलर आयफेल टॉवरवर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या चित्रपटाने आणखी एक इतिहास रचलाय. twitter ने प्रथमच एका बॉलिवूड सिनेमासाठी खास इमोजी तयार केले आहेत. गुरुवारपासून या चित्रपटाचा चाहता कधीही, कुठुनही सिनेमाशी निगडीत गोष्टी जाणून घेऊ शकतो. त्यासाठी त्याला #UdeDilBefikre, #Befikre, #BefikreOn9th, #BefikreOn9thDec and #BeBefikre यासारखे टॅग फॉलो करावे लागणार आहे. या सिनेमासाठी twitter ने एक खास इमोजी तयार केले आहे. सिनेमाशी निगडीत गप्पा मारताना चाहते या इमोजीचा वापर करु शकतात.
येत्या डिसेंबरमध्ये ‘बेफिक्रे’ प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 'बेफिक्रे'तील चुंबनदृश्ये आधीच चचेर्चा विषय बनली आहेत. चित्रपटातील एका गाण्यात तर तब्बल २१ चुंबनदृश्ये होती. तर ट्रेलरमध्ये १३ चुंबनदृश्ये दाखविण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ट्रेलरमध्ये १३ चुंबनदृश्ये असूनही सेन्सॉर बोर्डाने अगदी मोठ्या मनाने त्याला यूए प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळेच यावर्षीचा सगळ्यात बोल्ड चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे. ब-याच वर्षांनंतर आदित्य चोप्रा या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पुनर्पदार्पण करतोय.

Congo team @yrf for getting dis Special Emoji #UdeDilBefikre#Befikre#BefikreOn9th#BefikreOn9thDec & #BeBefikre with @TwitterIndia#RjAlokpic.twitter.com/1pxDpctgMM— RJ ALOK (@OYERJALOK) November 11, 2016