कुछ तो सिखो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 20:23 IST2016-05-10T14:53:12+5:302016-05-10T20:23:12+5:30

अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यात सुरू असलेल्या भांडणांमुळे सध्या सगळयांचेच चांगलेच मनोरंजन होत आहेत. दोघेही एकमेकांवर ...

Learn something | कुछ तो सिखो

कुछ तो सिखो

िनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यात सुरू असलेल्या भांडणांमुळे सध्या सगळयांचेच चांगलेच मनोरंजन होत आहेत. दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

हृतिक आणि कंगना यांचे पूर्वी अफेअर होते आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप केल्याचे म्हटले जाते. ब्रेकअपनंतरही अनेक सेलिब्रेटी आपल्या पूर्वप्रियकर-प्रेयसीशी खूप चांगले वागतात.

पण कंगना आणि हृतिकच्या बाबतीत ते दिसून येत नाहीये. आपल्या एक्सशी मैत्री कशाप्रकारे ठेवावी हे हृतिकने अभिनेता सलमान खानकडून शिकण्याची नक्कीच गरज आहे. 

* सोमी अली आणि सलमान खान

Somy ali

सलमानने बॉलिवुडमध्ये पदार्पण केल्यानंतर लगेचच अभिनेत्री सोमी अली त्याच्या आयुष्यात आली होती. सलमान आणि सोमीचे अफेअर अनेक वर्षं होते. सलमान संगीता बिजलानीकडे आकर्षिला जात आहे हे सोमीच्या लक्षात आल्यानंतर तिने त्याच्यासोबतचे ब्रेकअप केले.

पण आज इतक्या वर्षांनंतरही ते दोघे खूप चांगले फ्रेंडस आहेत. सोमीने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला असून ती एक एनजीओ चालवते. सलमान नेहमीच तिला तिच्या एनजीओच्या कामात मदत करतो. एवढंच नाही तर तिच्या एनजीओला तो आर्थिक मदतही पुरवतो. 

* संगीता बिजलानी आणि सलमान खान

Sangita BIjlani

संगीता आणि सलमानचे अफेअर खूपच सिरियस होते. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. पण त्यांच्यात काहीतरी बिनसले आणि त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याा गोष्टीला २० वर्षांपेक्षाही धिक काळ लोटून गेला आहे. पण आजही संगीता आणि सलमानला अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. तसेच सलमानच्या घरातील कार्यक्रमांनाही संगीता आवर्जून उपस्थित असते. 

* कतरिना कैफ आणि सलमान खान

Katrina Salman

बॉलिवुडमध्ये जम बसवण्यासाठी सलमानने कतरिनाला खूप मदत केली. आज त्यांचे ब्रेकअप झाले असले माझ्या करिअरमध्ये सलमानचा खूप मोठा हात असल्याचे कतरिना सांगते. कतरिना आणि सलमान यांची आजही चांगली मैत्री आहे. कतरिनाचे सलमानसोबतच त्याच्या कुटुंबियांसोबतचेही संबंध चांगले असल्यामुळे ती त्यांच्या घरातील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावते.

सलमानची बहीण अर्पिता हिच्या लग्नात तर सलमानशी लग्न न केल्यामुळे त्याने कतरिनाची सगळ््यांसमोर टरही उडवली होती. ते दोघे एकत्र चित्रपटही करणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Learn something

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.