जाणून घ्या, बॉलिवूडच्या ‘या’ स्टार सेलिब्रिटींनी गाजवले विविध फॅशन शोज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 18:21 IST2017-09-17T12:51:19+5:302017-09-17T18:21:19+5:30
अबोली कुलकर्णी ‘फॅशन शो’ या शब्दाचा उच्चार केला की, ‘फॅशन का हैं ये जलवा’ ही ‘फॅशन’ चित्रपटातील गाण्याची ओळ ...

जाणून घ्या, बॉलिवूडच्या ‘या’ स्टार सेलिब्रिटींनी गाजवले विविध फॅशन शोज!
‘फॅशन शो’ या शब्दाचा उच्चार केला की, ‘फॅशन का हैं ये जलवा’ ही ‘फॅशन’ चित्रपटातील गाण्याची ओळ सहज तोंडी येते. तसेच ‘हॉट अॅण्ड सेक्सी’ अंदाजात रॅम्पवॉक करत येणारी मॉडेल डोळयांसमोर नकळत येते. तिची अदा, तिची नजर, स्टाईल यामुळे आपण घायाळ होतो. खरंतर, रॅम्पवॉक, फॅशन शो, सिग्नेचर कलेक्शन्स या सर्व गोष्टी सेलिब्रिटींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आजपर्यंत अनेक फॅशन शोज गाजवले आहेत. पाहूयात, कोण आहेत हे सेलिब्रिटी ज्यांची एक अदा तुम्हाला मोहात पाडल्याशिवाय राहणार नाही.
बिपाशा बासु
मादक अदांनी एका नजरेत समोरच्या व्यक्तीला घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासु. तिला फॅशन शोज मध्ये रॅम्पवॉक करायला बेहद आवडते. तिचे कुरूळे केस, तिचा स्टनिंग लूक, तिची अदा यांच्या आपण नेहमीच प्रेमात पडतो.
सोनाक्षी सिन्हा
फॅशनचे दुसरे नाव म्हणजे सोनाक्षी सिन्हा. निवडक चित्रपट, कथानक आणि हिट चित्रपट देणारी सोनाक्षी तिच्या फॅशन सेन्सबद्दलही तेवढीच कॉन्शियस आहे. तिने आत्तापर्यंत अनेक फॅशन शोजमध्ये रॅम्पवॉक केला आहे. अनेक फॅशन शोची शो स्टॉपर म्हणूनही तिने नाव कमावले आहे.
जॉन अब्राहम
‘हॉट अॅण्ड हॅण्डसम’ जॉन अब्राहम हा त्याच्या फॅशन सेन्सबद्दल खूप कॉन्शियस असल्याचे आत्तापर्यंत दिसून आले आहे. त्याने महत्त्वाची भूमिका साकारलेल्या जॉन अब्राहमने चित्रपटांमध्येही हॅण्डसम लूकमध्ये काम केले आहे.
क्रिती सॅनन
बॉलिवूडची नव्या पिढीची हिरोईन म्हणून क्रिती सॅननकडे आपण पाहतो. तिने आत्तापर्यंत निवडकच पण महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्या चित्रपटात तिने काम केले आहे त्यात ती फॅशनेबल रूपात दिसली आहे. ती चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर एक यशस्वी मॉडेल होती हे देखील तितकेच खरे आहे.
सनी लिओनी
फॅशनचा विषय सुरू आहे आणि सनी लिओनीचे नाव घेतले नाही असे कसे होईल? कारण सनीच्या हॉट अदा, तिचा फॅशन सेन्स उपस्थित सर्वांनाच घायाळ करतो. तिची रॅम्पवॉक करण्याची स्टाईल भल्याभल्यांना मोहित करतो.