जाणून घ्या विनोद खन्नांच्या वैवाहिक आयुष्याविषयी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 16:10 IST2017-04-27T10:40:29+5:302017-04-27T16:10:29+5:30
बॉलिवूड आणि राजकारण दोन वेगळ्या क्षेत्रांमध्ये समतोल साधत या दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडणारा अभिनेता विनोद खन्ना यांचं निधन ...
.jpg)
जाणून घ्या विनोद खन्नांच्या वैवाहिक आयुष्याविषयी...
ब लिवूड आणि राजकारण दोन वेगळ्या क्षेत्रांमध्ये समतोल साधत या दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडणारा अभिनेता विनोद खन्ना यांचं निधन झालं. एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या विनोद खन्ना यांच्या जाण्यामुळे चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आयुष्यातील वैवाहिक जीवन हा त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यांच्या गितांजली आणि कविता अशा दोन पत्नी होत्या. जाणून घ्या त्यांची ओळख, प्रेम आणि घटस्फोट कसा झाला ते...
![]()
पहिली पत्नी गितांजलीच्या प्रेमात...
कॉलेज हे कंटाळवाणे असेल असे विनोद यांना वाटले होते. पण तिथे गेल्यावर त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. आपल्या कॉलेजच्या आयुष्याविषयी त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की,‘ मी कॉलेजमध्ये अनेक नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर तिथे अनेक प्रेयसी बनवल्या. मुलींच्या घोळक्यातच मी असायचो. त्याच दरम्यान माझी गितांजलीशी ओळख झाली. आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो. एका आठवड्यात मी १५ चित्रपट साईन केले. मला मिळालेल्या यशानंतर मी आणि गितांजलीने लग्न करायचे ठरवले. पण मी अभिनेता असल्याने कोणीच मला घर विकायला तयार नव्हते. हा एक वेगळा अनुभवदेखील त्यावेळी मी घेतला होता. घर घेतल्यावर मी आणि गितांजलीने लग्न केले. लग्नानंतर एकाच वर्षांत राहुल आमच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर अक्षय. मी चित्रपटाच्या चित्रीकरणात कितीही व्यग्र असलो तरी त्याकाळात रविवारी काम करत नसे.’
![]()
![]()
अध्यात्माकडे वळले विनोद...
काही काळानंतर विनोद खन्ना अध्यात्माकडे वळले. ओशो राजनीश यांनी सांगितलेल्या मार्गावर त्यांचे जीवन सुरू होते. राजनीश यांचा शिष्य बनून राहायचे असल्याने त्यांनी यूएसला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. भारतापासून ते दूर असल्याने गितांजलीसोबत त्यांचे वाद होत असत. त्यातूनच त्यांचा १९८५ मध्ये घटफोट झाला. विनोद खन्ना यांचे गुड लुक्स, उंच आणि शरीरयष्टीवर तरूणी एकदम फिदा असायच्या. अमृता सिंग हिच्यासोबतही त्यांची रिलेशनशिप होऊ लागली. मात्र, तरीही ते गितांजलीच्या आठवणींनी स्वत:ला एकटे समजत. काही काळ एकटे राहिल्यानंतर ते खचुन जावू लागले.
![]()
कवितासोबत केला दुसरा विवाह....
आयुष्यात त्यांना एकटेपणाची जाणीव होऊ लागली. त्यादरम्यान त्यांच्या आयुष्यात एक बिझनेसवुमन आणि उद्योगपती लालचंद हिराचंद यांची नात कविता दफ्तरी या आल्या. कविता यांची आई देखील त्यांच्या बिझनेसमध्ये अग्रेसर होती. त्या दोघांमध्ये प्रेम फुलू लागले. १९९० मध्ये त्यांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांच्या पोटी मुलगा साक्षी आणि मुलगी श्रद्धा यांनी जन्म घेतला.