‘दि गाझी अटॅक’चे न्यू पोस्टर लाँच ; पाहा, राणा डग्गुबती-तापसी पन्नूचा असाही अंदाज..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 18:32 IST2017-01-10T18:32:34+5:302017-01-10T18:32:34+5:30

राणा डग्गुबती, तापसी पन्नू, के.के.मेनन, अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘दि गाझी अटॅक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण ...

Launch of 'The Gazi Attack' New Poster; Look, Rana Daggubati-Tapasi Pannu too. | ‘दि गाझी अटॅक’चे न्यू पोस्टर लाँच ; पाहा, राणा डग्गुबती-तापसी पन्नूचा असाही अंदाज..

‘दि गाझी अटॅक’चे न्यू पोस्टर लाँच ; पाहा, राणा डग्गुबती-तापसी पन्नूचा असाही अंदाज..

णा डग्गुबती, तापसी पन्नू, के.के.मेनन, अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘दि गाझी अटॅक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण त्याअगोदर चित्रपटाचे पोस्टर्स पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली असते. चित्रपटातील एक न्यू पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरचे विशेष हे आहे की, या पोस्टरमध्ये तापसी, राणा, के.के. मेनन यांचे चेहरे एका पाणबुडीसोबत दिसत आहेत. तसेच या पोस्टरला निळ्या रंगाची एक छटा देण्यात आलेली आहे. हे पोस्टर प्रेक्षकांना नक्कीच १९७१ सालच्या इंडो-पाक पाणबुडीवरील युद्धात घेऊन जाईल, यात काही शंका नाही.

{{{{twitter_post_id####}}}}


या राणा डग्गुबतीने चित्रपटात नवल आॅफिसरची भूमिका केली आहे. गेल्या महिन्यात त्याने त्याचा फर्स्ट लुक लाँच केला होता. चित्रपटात तापसी पन्नू ही रिफ्युजीच्या भूमिकेत दिसतेय. एका मुलाखतीत बोलताना राणा म्हणाला,‘आम्ही दोन मोठ्या पाणबुड्या हैदराबादेत उभारल्या आहेत. आम्ही हिंदी आणि तेलुगू अशा दोन्ही भाषांमध्ये चित्रीकरण करत आहोत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून १९७१ अगोदरचा भारत यात चित्रीत करण्यात आलाय. माझे जन्मस्थळ ‘विझाग’ येथे आम्ही  पाणबुडीमध्ये शूटिंग केले. पाणबुडीच्या मध्ये तुम्हाला वेळेचा काहीही अंदाज येत नाही. पण, आम्ही तरीही खरंच खुप आनंदित आहोत. आता चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे.’

‘दि गाझी अटॅक’ हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होतोय. राणा डग्गुबाती आणि तापसी पन्नू यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘दी गाझी अटॅक’चे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रथमच समुद्रावरील लढाईचे दृश्य असणार आहे. समुद्रावर लढल्या जाणाऱ्या  युद्धाचा प्रसंग असलेला हा भारतातील पहिला चित्रपट असणार आहे. संकल्प यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ए.ए. फिल्म्स मॅटिनी एंटरटेनमेंट आणि पीव्हीवी सिनेमासोबत मिळून करणने हा चित्रपट बनवला आहे.

Web Title: Launch of 'The Gazi Attack' New Poster; Look, Rana Daggubati-Tapasi Pannu too.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.